भोंदूबाबा खरातचं सगळ्यात घाणेरेडं कृत्य, 'शंकराच्या पिंडीजवळ देखील महिलांना घेऊन...', 'ती' गोष्ट ऐकून तुम्हीही जाल हादरून!

मुंबई तक

अशोक खरात हा मंदिऱ्यातील गाभाऱ्यात देखील महिलांसोबत अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. पाहा त्यांनी नेमके कोणकोणते आरोप केले आहेत.

ADVERTISEMENT

ashok kharat most heinous act he would take women even near shiva lingam and sexually assault them serious allegations by trupti desai
अशोक खरातवर आणखी गंभीर आरोप
google news

सिन्नर: सामाजिक कार्यकर्त्या व भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आज (24 मार्च) मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिर व खरातच्या फार्महाऊसला भेट देऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कॅप्टन अशोक खरात यांच्यावर जमीन लुटण्यापासून ते महिलांच्या लैंगिक शोषणापर्यंत गंभीर आरोप केले. ईशान्येश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात नेऊन तो तिथेही महिलांवर लैंगिक अत्याचार करायचा त्यामुळे खरात ‘माणसाच्या रूपातील राक्षस आहे.’ असं म्हणत तृप्ती देसाईंनी खरातला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली. त्याचबरोबर त्याच्या साथीदारांनाही शिक्षा मिळावी, असे स्पष्ट मत व्यक्त केले.

'मंदिराच्या गाभाऱ्यात नेऊन महिलांवर...', तृप्ती देसाईंचे खळबळजनक आरोप

तृप्ती देसाई म्हणाल्या, “मिरगावचं नाव हे या अशोक खरातमुळे बदनाम होतंय. गावकरी चिंतेत आहेत की, आपल्या गावाचं नाव खराब नाही झालं पाहिजे. मिरगावमध्ये ज्या पद्धतीने अशोक खरातने अनेक जमिनी लुटल्या असतील, जमीन खरेदीत सहकार्य केलं नसेल तर त्यांना गायब करणं किंवा मारून टाकणं, इथपर्यंत गोष्टी समोर आलेल्या आहेत.”

हे ही वाचा>> 'अशोक खरातला भेटलेल्या लोकांची HIV टेस्ट करा, नाहीतर सगळे मरतील', बड्या नेत्याची थेट विधानसभेत मागणी

महिलांच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा सर्वांत गंभीर असल्याचे सांगताना त्या म्हणाल्या, “100 च्या वर पुरावे समोर आलेले आहेत. 5 मार्च 2026 रोजी जेव्हा ही माहिती व काही व्हिडिओ आमच्याकडे आले, तेव्हा सांगितलं गेलं की, नाशिकच्या त्याच्या ऑफिसमध्ये जसं लैंगिक शोषण केलं जायचं, तसंच ईशान्येश्वर मंदिरातील पायऱ्या उतरून गाभाऱ्यातही केलं जायचं. गाभारा हा फार पवित्र असतो. मी देवाला मानणाऱ्यातील आहे. मी आल्यावर पहिले देवाला नमस्कार केला. ज्या देवाच्या नावावर ही काळीकृत्यं करत होता, त्या देवालाही तो घाबरत नव्हता. गाभाऱ्यातील पिंडीच्या कोपऱ्यातही महिलांना घेऊन अत्याचार करायचा. पिंडीच्या शेजारी बोलावून चुकीचे प्रकार करायचा. हे अत्यंत गंभीर आहे.”

खरातला ‘राक्षस’ म्हणत तृप्ती देसाईंनी कठोर शिक्षेची मागणी केली आहे. “माणसाच्या रूपात एखादा राक्षस असणं म्हणजे तो अशोक खरात आहे. त्यामुळे अशोक खरातला यामध्ये फासावर लटकवलं पाहिजे. याच्यातून त्याची सुटका नाही झाली पाहिजे. त्याच्याबरोबर ट्रस्टवर असलेले, काळ्या धंद्यात साथीदार, पार्टनरशिपमध्ये असलेले, कमिशन घेणारे एजंट या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे.”

हे वाचलं का?