'अशोक खरातला भेटलेल्या लोकांची HIV टेस्ट करा, नाहीतर सगळे मरतील', बड्या नेत्याची थेट विधानसभेत मागणी

मुंबई तक

Ashok Kharat Case News : अशोक खरात या नाशकातील भोंदूबाबाला जे लोकं भेटल्यात त्या लोकांची HIV टेस्ट सरकारने करुन घ्यावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

Ashok Kharat Case News
Ashok Kharat Case News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'अशोक खरातला भेटलेल्या लोकांची HIV टेस्ट करा, नाहीतर सगळे मरतील'

point

बड्या नेत्याची थेट विधानसभेत मागणी

Vijay Wadettiwar on Ashok Kharat : "अशोक खरात या भोंदूबाबाला जे भेटलेत, त्या लोकांची HIV टेस्ट आपल्याला करुन घ्यावी लागेल. सरकारनेच ही टेस्ट करुन घेतली पाहिजे. नाहीतर संसर्गजन्य रोग होईल आणि सगळेच मरतील.", अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली आहे. 

हेही वाचा : "देवेंद्र फडणवीस.., तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशय..", अशोक खरात प्रकरणी राज ठाकरेंची प्रतिक्रिया

व्हिडीओमध्ये आलेत त्या सर्वांचे मोबाईलचे सीडीआर चेक केले पाहिजेत - वडेट्टीवार 

विजय वडेट्टीवार म्हणाले, अशोक खरात या भोंदूबाबाचे 100 च्या वर कारनामे समोर आले आहेत. त्याच्या व्हिडीओ क्लीप समोर आले आहेत. देवाच्या आणि धर्माच्या नावाने फसवणारे हे भोंदू तयार होत आहेत. आपण पुरोगामी महाराष्ट्रा म्हणत असतो. मात्र, यामध्ये राजकीय क्षेत्रातील लोकं, आयएएस अधिकारी देखील आहेत. महसूल विभागाचे अधिकारी देखील आहेत. व्हिडीओ क्लीपमध्ये आलेत, व्हिडीओमध्ये आलेत त्या सर्वांचे मोबाईलचे सीडीआर चेक केले पाहिजेत. तो जल तयार करायचा. त्यामध्ये व्हाग्रा टाकायचा. त्या वेळेस ते देणारे कोण होते? ते देण्यासाठी कोणी आग्रह केला? हे मी सांगणार नाही. कारण मी सबंधितांना नोटीस दिलेली नाही. या प्रकरणामुळे महाराष्ट्राची देशात बदनामी झाली आहे. काही अधिकारी त्यांच्यावर कारवाई होऊ नये, यासाठी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून प्रयत्न करत होते. संपूर्ण महाराष्ट्राची या प्रकारामुळे मान शरमेने खाली गेली आहे. 

हेही वाचा : साताऱ्याच्या ZP राड्यानंतर एकनाथ शिंदे विधानसभेत आक्रमक, देवेंद्र फडणवीसांचा तातडीने मोठा निर्णय

हे वाचलं का?

    follow whatsapp