साताऱ्याच्या ZP राड्यानंतर एकनाथ शिंदे विधानसभेत आक्रमक, देवेंद्र फडणवीसांचा तातडीने मोठा निर्णय
Devendra Fadnavis on Satara ZP Rada : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी झालेल्या राड्याप्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मोठा निर्णय घेतलाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
साताऱ्याच्या ZP राड्यानंतर एकनाथ शिंदे विधानसभेत आक्रमक
देवेंद्र फडणवीसांचा तातडीने मोठा निर्णय
Devendra Fadnavis on Satara ZP Rada : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीदरम्यान राज्याचे पर्यटन मंत्री साताऱ्याचे पालकमंत्री मंत्री शंभूराज देसाई यांना झालेल्या धक्काबुक्की आणि मतदारांना रोखल्याच्या गंभीर प्रकरणाची दखल विधान परिषदेत घेण्यात आली असून, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी सातारा पोलीस प्रशासनावर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. दरम्यान, साताऱ्यात झालेल्या राड्याप्रकरणी विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा निर्णय घेतलाय. आधी उपमुख्यमंत्री आणि नंतर मुख्यमंत्री विधानसभेत बोलताना नेमकं काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊयात...
Maharashtra Vidhan Sabha 2026 LIVE: अधिवेशनाचा अठरावा दिवस, विधानसभेचं कामकाज सुरू | Eknath Shinde
एकनाथ शिंदे विधानसभेत बोलताना काय म्हणाले?
एकनाथ शिंदे विधानसभेत बोलताना म्हणाले, या सभागृहात सन्माननीय अर्जुन खोतकर आणि शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा परिषदेत झालेली घटना आपल्यासमोर मांडलेली आहे. त्याचा मी देखील साक्षीदार आहे. कारण ही निवडणूक प्रक्रिया जेव्हा सुरु झाली, त्यावेळी शंभूराज देसाई यांनी मला फोन केला होता. मकरंद पाटील पण तिकडे होते. ते म्हणाले की, दोन मतदारांवर पूर्वीच्या काळातील म्हणजे 5-10 वर्षांपूर्वीचा गुन्हा एक दिवस आधी दाखल केलाय आणि त्यांना अटक करणार आहेत. मी पोलीस अधिक्षकांना फोन केलेला आहे. ते म्हणाले, गु्न्हा दाखल झालेला आहे, आपण त्याच्यावर कारवाई नंतर करु. मी त्यांना एकच सांगितलं उद्या मतदान आहे. मतदानापासून कोणालाही वंचित ठेवता येत नाही. न्यायालय देखील मतदानापासून वंचित ठेऊ नका, असं सांगतं. एसपी म्हणाले, मी मतदानापासून वंचित ठेवणार नाही. त्यानंतर पोलीस महासंचालकांना फोन केला. त्यांना मी सांगितलं की, मला शंका आहे, दोन मत कमी करण्यासाठी आणि पराभव करण्यासाठी काहीतरी वेगळं घडू शकतं. मतदानापासून वंचित ठेवणे हा गुन्हा आहे. मी त्यांना सांगितलं, लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करु नका. ते म्हणाले असं काही होणार नाही. परंतु, त्यानंतर मीडियामध्ये देखील मी पाहिलं. त्यांनी मंत्री बघितले नाहीत, पदाधिकारी बघितले नाहीत. आमदार बघितले नाहीत. आरोपीला पकडतात तसं पकडून घेऊन गेले. बरं मग त्यांनी दोनच मतदार कसे पकडले? दोनच मतदारांना ते घेऊन गेले. मी डिजींना फोन केला, ते म्हणाले, असं होणार नाही. मी म्हटलं निवडणूक तिकडं पार पडलीये. अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या इतिहासा पहिल्यांदा पाहायला मिळाली. मतदानापासून वंचित ठेवणे यापूर्वी कधीही घडलं नाही.
देवेंद्र फडणवीसांचा तातडीने मोठा निर्णय
दरम्यान, एकनाथ शिंदेंनी हे मुद्दे मांडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात याबाबत भाष्य केलं. ते म्हणाले, सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तूस्थिती सांगितलेली आहे. त्या वस्तूस्थितीच्या आधारे या प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल. चौकशीतून जे निष्पन्न होईल, त्यानुसार कारवाई केली जाईल.










