रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचा फोटो गायब..., सुनील तटकरेंच्या कार्यक्रमात काय घडलं?

मुंबई तक

Sunil Dattatray Tatkare NCP banner in Raigad Aditi Tatkare : रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचा फोटो गायब... फक्त सुनिल तटकरे आणि आदिती तटकरेंच्या फोटोंमुळे चर्चांना उधान

ADVERTISEMENT

Sunil Dattatray Tatkare NCP banner in Raigad Aditi Tatkare
Sunil Dattatray Tatkare NCP banner in Raigad Aditi Tatkare
google news

बातम्या हायलाइट

point

रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचा फोटो गायब...

point

सुनील तटकरेंच्या कार्यक्रमात काय घडलं?

Sunil Dattatray Tatkare  Aditi Tatkare NCP banner in Raigad : रायगड जिल्ह्यातील इंदापूरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नूतन सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे मंत्री अदिती तटकरेंच्याच मतदारसंघातच हा कार्यक्रम झाला. 27 मार्चला झालेल्या या कार्यक्रमाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंची विशेष उपस्थिती होती. त्यांच्याच मागे लावलेला हा बॅनर पाहा... या बॅनरवर फक्त सुनिल तटकरे,आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरेंसह स्थानिक नेत्यांचे फोटो दिसत आहेत. याच बॅनरवरुन दिवंगत अजित पवारांचा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा फोटो मात्र गायब आहे. म्हणजेच ज्या बॅनरवर स्थानिक नेत्यांनाही स्थान मिळालंय. तिथं राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि ज्यांच्या नेतृत्वामुळे रायगडमधील अनेकांना ओळख मिळाली त्या अजितदादांच्या फोटोला मात्र डावलण्यात आलं. याचेच फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंनी तर याच मुद्द्यावरुन धक्कादायक दावे केलेत. विकास लवांडेंनी त्यांच्या सोशल मिडीयावरील पोस्टमधून काय म्हटलंय ते पाहा..

"अजित दादांचा #NCP पक्ष ताब्यात घेण्याचे आधीपासूनचेच मनसुबे लपवून राहिलेले नाहीत. त्याची सुरुवात रायगड पासून झाली आहे. आदरणीय अजित दादांचा आणि उपमुख्यमंत्री @SunetraA_Pawar वहिनींचा पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमात बॅनरवर नाव किंवा फोटो सुद्धा नाही. याला कृतघ्नता म्हणतात. अजित दादांनी यांना पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर अनेक वर्षे ठेवल्यामुळे यांची राज्यपातळीवर प्रतिष्ठा वाढली. यांनी पक्षांतर्गत ओबीसी मराठा असा जातीयवाद सुद्धा वाढवलेला आहे जे अजितदादांना पटत नव्हते. @SunilTatkare तुमच्यात हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष प्रफुल पटेल यांना सोबत घेऊन काढावा. किंवा भाजपमध्ये जाण्यासाठी तुम्ही आधीपासूनच तयार आहात तर तुमची चार चौकडी घेऊन तुम्ही जावे. तुमच्या कृतघ्नतेचा तीव्र निषेध !" अशा शब्दात विकास लवांडेंनी निषेध केलाय. 

म्हणजेच गेल्या दोन तीन दिवसांपासून राजकीय वर्तुळात ही अशी उलटसुलट चर्चा सुरु आहे. माणगाव तालुकाध्यक्ष काका नवगणे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मुंबई तकने यासंदर्भात संपर्क साधला असता नवगणेंनी बोलण्यास नकार दिला. 

हे वाचलं का?