मोठी बातमी.. चाकणकरांना खरात प्रकरण प्रचंड भोवलं, दिला सलग दुसरा राजीनामा! म्हणाल्या, ‘मी सकाळी सुनेत्रा वहिनींसोबत…’
Rupali Chakankar NCP Resignation: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्य महिला आयोग अध्यक्ष पद गमावलेल्या रुपाली चाकणकर यांना आता राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदही सोडावं लागलंय.
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (राष्ट्रवादी) महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना भोंदूबाबा अशोक खरातशी सलगी करणं प्रचंड महागात पडलं आहे. कारण या प्रकरणामुळेच सुरुवातीला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या चाकणकरांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा द्यावा लागला आहे.
खरात प्रकरणातील वादाच्या पार्श्वभूमीवर रूपाली चाकणकरांनी 27 मार्च रोजी रात्री उशिरा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला.
आपल्या पदाचा राजीनामा देताना केलेल्या ट्विटमध्ये चाकणकर म्हणतात की, ‘आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.‘

याबाबत त्यांनी सोशल मीडियावर (एक्स) एक विस्तृत पोस्ट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.









