कॉमेडियन पुलकित मणी यांना मंचावर बोलवणं आणि पीएम मोदी यांची मिमिक्री करणं हा अपमान?

मुंबई तक

इंदूरमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात स्टँडअप कॉमेडियन पुलकित मणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करत स्किट सादर केलं. या कार्यक्रमात राहुल गांधीही मंचावर उपस्थित होते. काँग्रेसने या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

ADVERTISEMENT

Rahul Gandhi and Pulkit Mani
Rahul Gandhi and Pulkit Mani
Google CTA

बातम्या हायलाइट

point

इंदोरमधील 'छात्रों की गूंज'वरुन राजकीय वाद

point

पीएम मोदी यांची मिमिक्री करणं हा अपमान?

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या इंदोर येथे पार पडलेल्या 'छात्रों की गूंज' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करण्यात आल्याने नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात स्टँड-अप कॉमेडियन पुलकित मणि याने पंतप्रधान मोदींची हुबेहूब नक्कल करत त्यांच्या आंतरराष्ट्रीय नेत्यांसोबतच्या भेटीगाठी, हावभाव आणि बोलण्याच्या पद्धतीवर उपहासात्मक टीका केली. या मिमिक्री शोमुळे या कार्यक्रमाला एका कॉन्सर्टसारखे स्वरूप आले असले तरी, यात वापरण्यात आलेल्या काही संवादांमुळे देशाच्या राजकीय वर्तुळात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

'त्यांनी कॉमेडियन बनावे...'

या वादाचे मुख्य कारण म्हणजे कॉमेडियन मणि याने नोटाबंदीच्या काळाचा संदर्भ दिला. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या स्वर्गीय आईचा अवमान झाल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. या प्रकारानंतर भाजप नेत्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'राहुल गांधींनी राजकारण सोडून फुल टाईम कॉमेडियन बनावे' असा टोला लगावला. तर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसला 'जोकर पार्टी' म्हणत राहुल गांधींनी नैतिक दिवाळखोरीची सीमा पार केल्याचा संतापजनक आरोप केला आहे. काँग्रेसच्या व्यासपीठावर देशाच्या पंतप्रधानांचा आणि त्यांच्या आईचा अपमान झाल्याची भावना भाजपने व्यक्त केली आहे.

हे ही वाचा : 'मुलाला वापरले जातीवरून नको ते शब्द, 'त्या' दोन प्राध्यापकांना...'. साहिल वाकडेच्या वडिलांचे गंभीर आरोप

भाजपला आत्मपरीक्षणाची गरज

या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसने सावध भूमिका घेत हा कार्यक्रम 'अनस्क्रिप्टेड' म्हणजेच पूर्वलिखित नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, स्वतःच्या व्यासपीठावर घडलेल्या या प्रकाराची जबाबदारी काँग्रेसला पूर्णपणे झटकता येणार नाही. दुसरीकडे, या वादाच्या निमित्ताने एक वेगळी चर्चाही सुरू झाली आहे. सोनिया गांधी यांच्यावर भाजपच्या समर्थकांकडून यापूर्वी सोशल मीडियावर करण्यात आलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील वैयक्तिक आणि अश्लाघ्य टिकेची आठवण करून देत, भाजपने इतरांवर टीका करण्यापूर्वी स्वतःही आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे.

हे ही वाचा : Personal Finance: SIP सुरू केली, पण मध्येच पैसे काढले तर?

पुलकित मणिला धमक्यांचे फोन

या वादानंतर 'हनी इज फनी' या नावाने प्रसिद्ध असलेल्या पुलकित मणि या कॉमेडियनला धमक्यांचे फोन येऊ लागले असून त्याच्या जीवाला धोका असल्याने त्याचे अनेक शोज रद्द करण्यात आले आहेत. या संपूर्ण घटनाक्रमावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, काँग्रेसने आता मिमिक्री आणि उपरोधाचा राजकीय हत्यार म्हणून प्रभावीपणे वापर करण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारच्या उपहासात्मक विनोदांमुळे भाजप नेते लगेचच संतप्त होत असल्याने, भाजपला राजकीय विनोद आणि उपरोध सहन होत नाही हे दाखवून देण्यात काँग्रेस कुठेतरी यशस्वी ठरत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.