पवार कुटुंबाच्या राजकारणातील दुसऱ्या पिढीचा चेहरा हरपला! कसा होता पवार घराण्याचा राजकारणातील प्रवास?
Pawar Family : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. यामुळे सगळ्या राज्यावर शोककळा पसरील आहे. राज्याच्या राजकारणात पवार कुटुंब हे केंद्रस्थानी राहिले आहे. शरद पवार यांच्यामुळे पवार घराण्याचा नावलौकिक सर्वत्र पसरला. शरद पवारांनंतर पवार घराण्यातील दबदबा असणारे नेते म्हणून अजित पवार यांची ओळख होती. कसा होता पवार घराण्याचा राजकारणातील प्रवास, जाणून घेऊया..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पवार कुटुंबाच्या राजकारणातील दुसऱ्या पिढीचा चेहरा हरपला!
कसा होता पवार घराण्याचा राजकारणातील प्रवास?
Pawar Family : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. यामुळे सगळ्या राज्यावर शोककळा पसरील आहे. राज्याच्या राजकारणात पवार कुटुंब हे केंद्रस्थानी राहिले आहे. शरद पवार यांच्यामुळे पवार घराण्याचा नावलौकिक सर्वत्र पसरला. शरद पवारांनंतर पवार घराण्यातील दबदबा असणारे नेते म्हणून अजित पवार यांची ओळख होती. कसा होता पवार घराण्याचा राजकारणातील प्रवास, जाणून घेऊया..
पवार कुटुंबाच्या राजकारणातील दुसऱ्या पिढीचा चेहरा हरपला!पवार कुटुंब मुळचे सातारा जिल्ह्याचे होते, पण नंतर ते बारामतीमध्ये येऊन स्थायिक झाले. पवार कुटुंबाला 'शेतकरी कामगार पक्षा'चा वारसा लाभलेला होता. शरद पवारांचे वडील गोविंदराव पवार हे स्थानिक शेतकरी संघाचे अध्यक्ष होते, तर त्यांची आई शारदाबाई पवार या लोकल बोर्डाच्या सदस्या होत्या.
गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांना 11 अपत्ये होती. त्यांची सात मुले - वसंतराव, अप्पासाहेब, अनंतराव, शरद, बापूसाहेब, सूर्यकांतराव आणि प्रतापराव; तर चार मुली - सरला, सरोज, मीना आणि लीला अशी त्यांची नावे आहेत.
सर्वात मोठे बंधू वसंतराव पवार वकील होते. अप्पासाहेबांनी कृषी विषयाचे शिक्षण घेतले होते. अनंतरावही शेतीशी संबंधित होते. बापूसाहेब इंजिनिअर बनले. सूर्यकांत यांनी बडोद्यातून शिक्षण पूर्ण केले आणि ते आर्किटेक्ट झाले. प्रतापराव पवार यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.