West Bengal Assembly Election Result 2026: झालमुरी ते कालीघाट.. PM मोदींनी कमालच केली, दीदी हैराण.. भाजप तब्बल 'एवढ्या' जागांवर आघाडीवर
West Bengal Election Result 2026 Latest updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. यावेळी बंगालच्या जनतेने नेमका कोणाला कौल दिला आहे याकडेच आता अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.
ADVERTISEMENT

WB Results Vote Counting: कोलकाता: पश्चिम बंगालच्या 294 सदस्यीय विधानसभेसाठी दोन टप्प्यात झालेल्या मतदानानंतर आज (4 मे) रोजी मतमोजणी होणार आहे. 23 एप्रिलला पहिल्या टप्प्यात 152 जागांसाठी आणि 29 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात 142 जागांसाठी मतदान झाले. एकूण 7.04 कोटी मतदारांपैकी 92.93 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हा राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक मतदान टक्का आहे. निवडणूक आयोगाने (ECI) तीन स्तरांची सुरक्षा व्यवस्था करून मतमोजणीसाठी पूर्ण तयारी केली आहे. कोलकाता, हावडा, बारासातसह 77 मतमोजणी केंद्रांवर ईव्हीएम मशीन स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या असून, सीसीटीव्ही, केंद्रीय दल आणि राज्य पोलिसांची कडक नजर ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.
प. बंगाल विधानसभा निवडणूक निकाल LIVE
- भाजप 190 जागा तर टीएमसी अवघ्या 98 जागांवर आघाडीवर
- ममता बॅनर्जी भवानीपूर या आपल्या मतदारसंघातून पिछाडीवर, याशिवाय त्यांचा पक्ष TMC ची देखील घसरण
- भाजप ११३ जागांवर आघाडीवर आहे, तर सुरुवातीच्या कलांनुसार तृणमूल काँग्रेस १०० जागांवर आघाडीवर आहे.
- प्राथमिक कलांनुसार बागनान आणि आमता मतदारसंघांमध्ये तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. बोलपूर, चंचल, सुजापूर आणि रातुआ विधानसभा मतदारसंघांमध्येही टीएमसी आघाडीवर आहे. दरम्यान, मालतीपूर आणि मोथाबारी मतदारसंघांमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे.
- तृणमूल काँग्रेस आता ६५ जागांवर आघाडीवर असून, भाजप ५१ जागांवर आघाडीवर आहे.
- ममता बॅनर्जी पिछाडीवर
- सुरुवातीच्या कलांनुसार, तृणमूल काँग्रेसने ५० जागांवर आघाडी घेतली असून, भाजप ४० जागांवर आहे. तथापि, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या भवानीपूर मतदारसंघात पिछाडीवर आहेत, तर भाजपचे सुवेंदू अधिकारी भवानीपूर आणि नंदीग्राम या दोन्ही मतदारसंघांत आघाडीवर आहेत.
- बंगाल विधानसभा निवडणूक निकाल: सुरुवातीच्या कलांनुसार बीजेपी आणि टीएमसीमध्ये अटीतटीची लढत सुरू
- सुरुवातीच्या कलांनुसार, भाजप आता ३१ जागांवर आघाडीवर आहे, तर तृणमूल काँग्रेस (TMC) २७ जागांवर पुढे आहे. दोन्ही पक्षांमधील अंतर कमी झाले असून मोठी चुरस पाहायला मिळत आहे.
- पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी सुरू होण्यापूर्वी, सकाळी 6.30 वाजता भवानीपूरच्या सखावत मेमोरियल स्कूलबाहेर TMC आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. अनेक भागांत वीज कपात केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने (TMC) केला आहे. भवानीपूरच्या जागेवर ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी आमने-सामने आहेत. दरम्यान, वीज कपातीच्या तक्रारीवर निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, 'हा वीज विभागाचा विषय आहे.'
- प. बंगाल विधानसभा निवडणूक: मतमोजणीला थोड्याच वेळात होणार सुरुवात
मुख्य पक्ष आणि राजकीय समीकरण
ही निवडणूक TMC (ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस) विरुद्ध भाजप (BJP)यांच्यात मुख्य लढत आहे. ममता बॅनर्जी चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपने ‘परिवर्तन’चा नारा देत 170+ जागांचे लक्ष्य ठेवले आहे.
एक्झिट पोल: ‘टुडेज चाणक्य’ने भाजपला 192±11 जागा, टीएमसीला 100 ±11 जागा दिल्या; इतर पोलमध्ये 140-160 जागा भाजपला दिल्या आहेत. दरम्यान, ममता बॅनर्जींनी एक्झिट पोलचे हे आकडे फेटाळले आहेत.
राजकीय महत्त्व
बंगालमध्ये शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि कायदा-सुव्यवस्था हे मुख्य मुद्दे आहेत. विक्रमी मतदानाने ‘परिवर्तनाची लाट’ दाखवली असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. तर टीएमसीने ‘जनतेचा विश्वास’ आपल्यावरच असल्याचा दावा केला आहे.









