Election Results 2026 LIVE: 5 राज्यातील विधानसभा निवडणूक निकाल, तामिळनाडूत काँग्रेसचा थलपती विजयला हात?

मुंबई तक

Assembly Elections 2026 Vote Counting: तामिळनाडू, केरळ, आसाम, पुदुच्चेरी आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज (4 मे) होणार आहे. निकालाचे प्रत्येक अपडेट तुम्हाला मुंबई Tak वर पाहायला मिळतील.

ADVERTISEMENT

assembly election 2026 live vote counting west bengal tamil nadu kerala assam puducherry
assembly election 2026 live
google news

Assembly Election Results 2026: मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, आसाम, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि पश्चिम बंगाल या पाच राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज (4 मे) रोजी होणार आहे. एकाच दिवशी सर्व 824 विधानसभा जागांसाठी मतमोजणी सुरू होईल आणि निकाल दिवसभरात हळूहळू जाहीर होतील. मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळपर्यंत बहुतेक निकाल स्पष्ट होतील, असे ईसीआयने स्पष्ट केले आहे. 

या निवडणुकीत सुमारे 17.4 कोटी मतदारांनी भाग घेतला असून, ही 2029च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीची महत्त्वाची 'सेमी-फायनल' मानली जात आहे. भाजप, काँग्रेस, तृणमूल, डीएमके, एआयएडीएमके, टीव्हीके, एलडीएफ आणि यूडीएफ यासारख्या प्रमुख पक्षांमध्ये कडवी लढत झाली. मतदान प्रक्रिया एप्रिल महिन्यात विविध टप्प्यात पार पडली.

5 राज्यातील विधानसभा निवडणूक निकाल LIVE

• पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री एन. रंगासामी हे विजयी झाले आहेत. त्यांना 10,024 इतकी मतं मिळाली. त्यांना 4, 441 इतकं मताधिक्य मिळालं.

• तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टालिन यांनी सुरुवातीच्या पिछाडीनंतर आघाडी घेतली आहे. सहाव्या फेरीअखेर ते 3056 मतांनी आघाडीवर आहेत.  

हे वाचलं का?