'आमची हाय लागल्याशिवाय राहणार नाही...', शिंदे गटात गेलेल्या बच्चू कडूंवर कार्यकर्ता तुफान चिडला.. नको नको ते बोलला!

मुंबई तक

Bacchu Kadu: "बच्चू कडू हे स्वार्थासाठी शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत. त्यांनी आम्हाला गृहीत धरलं", अशी संतप्त टीका प्रहार पक्षाच्या एका कार्यकर्त्याने केली आहे. पाहा तो कार्यकर्ता नेमकं काय-काय म्हणाला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई: प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी 30 एप्रिल 2026 रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. या निर्णयानंतर पक्षातील काही कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष व्यक्त होत आहे. बच्चू कडूंच्या निर्णयाबाबत माध्यमांशी बोलताना एका कार्यकर्त्याने अत्यंत संतप्त स्वरुपाची प्रतिक्रिया दिली आहे.

'आमची हाय तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही...' असं थेट म्हणत या कार्यकर्त्याने बच्चू कडूंवर जहरी टीका केली आहे. बच्चू कडूंचं राजकीय करिअर कधीच मोठं होणार नाही.. असंही यावेळी या कार्यकर्त्याने म्हटलं आहे. 

'तुम्ही गुवाहटीला पण स्वत:साठी गेले होते आणि आजही...', पाहा कडूंचा कार्यकर्ता काय-काय बोलून गेला!

'माझ्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला वाटतं.. अहो ठीक आहे एखादा कलंक लागला आणि जर दिव्यांगाचं भलं होत असेल तर आपण गेलेलं ठीक आहे. पण भाऊ आज तुम्ही कुठल्या तोंडानं सांगणार का गेले म्हणून? ठीकए.. तुम्ही गेले तर गेले ओ.. आमचं राजकीय करिअर संपवून गेले ना.'

'म्हणजे तुम्ही आम्हाला गृहीत धरलं. की, यांची काहीच औकात नाही.. म्हणजे मी जिथे म्हणेल तिथे हे पागल येतील. हे डोक्यातून काढून टाका. तुम्ही गेले... तुम्ही गुवाहटीला पण स्वत:साठी गेले होते.. आज आम्ही या मतावर ठाम आहोत. आणि जे तुम्ही विधान परिषदेवर गेले हे देखील तुम्ही स्वत:साठीच गेलेत.'

हे वाचलं का?