'शांती, विश्वास, एकाकी प्रेम..' रुममध्ये नग्नावस्थेत सापडला मृतदेह, मृत्यूआधी पूजानं भिंतीवर काय लिहिलं?
बेंगलोरमध्ये काही दिवसांपूर्वी एका रुममध्ये पूजा नावाच्या महिलेचा नग्नावस्थेतील मृतदेह सापडला होता. यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. यानंतर सुरु झालेल्या पोलीस तपासातून दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. याविषयी पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'शांती, विश्वास, एकाकी प्रेम..'
रुममध्ये नग्नावस्थेत सापडला मृतदेह
मृत्यूआधी पूजानं भिंतीवर काय लिहिलं?
Crime News : बेंगलोरमध्ये काही दिवसांपूर्वी एका रुममध्ये पूजा नावाच्या महिलेचा नग्नावस्थेतील मृतदेह सापडला होता. यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. यानंतर सुरु झालेल्या पोलीस तपासातून दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. पोलिसांनी केलेल्या नव्या खुलाशानुसार, तिच्या खोलीतील भिंतींवर शांती, अहंकार, विश्वास, संतुष्टी, प्रेम आणि एकाकी प्रेम यांसारखे शब्द लिहिलेले कागद चिकटवण्यात आले होते, तर खोलीत अनेक कार्ड्स विखुरले होते. या प्रकरणी पोलिसांनी नेमके काय खुलासे केले आहेत, जाणून घेऊया.
तीन महिन्यांपासून जगाशी संपर्क तुटला
पोलीस तपासात समोर आले आहे की, पूजाचा मोबाईल गेल्या तीन महिन्यांपासून बंद होता. रिचार्ज संपल्यामुळे नंबर बंद झाला होता आणि या काळात तिने कोणाशीही संपर्क साधला नव्हता. ती पूर्णपणे एकाकी जीवन जगत होती आणि ती डिप्रेशनमध्ये होती, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, इतके महिने कोणाशीही संपर्क नसताना ती आपला उदरनिर्वाह कशी करत होती, हा मोठा प्रश्न आहे.
हे ही वाचा : Emergency Alert: तुमच्याही फोनमध्ये अचानक वाजू लागला सायरन? लोकं घाबरून पाहू लागले एकमेकांकडे!
आर्थिक मदतीचा स्रोत काय?
पूजा पूर्वी तंत्रज्ञ म्हणून काम करायची. मात्र काही वर्षांपूर्वी तिने ही नोकरी सोडली होती. नोकरी नसताना घराचे भाडे आणि दैनंदिन खर्च ती कसा भागवत होती, याचा पोलीस शोध घेत आहेत. तिला कोण आर्थिक मदत करत होते का, हे तपासण्यासाठी तिचे बँक खाते आणि गेल्या एका वर्षातील आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरु आहे. तसेच तिने नोकरी का सोडली याविषयी कंपनीकडून माहिती घेतली जात आहे.
हे ही वाचा : 'गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायचा नाही..सहन करायचं..' भोर अत्याचार प्रकरणावरुन सुषमा अंधारे संतापल्या
कौटुंबिक पार्श्वभूमी आणि दुःखद भूतकाळ
पूजाचे वडील सनातन दत्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात पूजाचे लग्न झाले होते, मात्र दुर्दैवाने त्याच काळात तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. त्याच्या निधनाने पूजाला जबरदस्त धक्का बसला होता. त्यानंतर गेल्या चार वर्षांपासून ती नैराश्याशी झुंज देत होती. 2023 मध्ये कामासाठी ती बेंगलोरला आली, मात्र त्यानंतर तिने कुटुंबाशी संपर्क तोडून टाकला. तिचे वडील दोन वेळा बेंगलोरला येऊन गेले मात्र ती त्यांना भेटली नाही किंवा तिने स्वतःचा फोन नंबरही त्यांना दिला नव्हता. तसेच त्यांनी सांगितले की, पूजा अभ्यासात अतिशय हुशार होती. तिचा मृत्यू झाल्याचं ऐकून तिच्या आईचीही तब्येत बिघडली आहे.









