Emergency Alert: तुमच्याही फोनमध्ये अचानक वाजू लागला सायरन? लोकं घाबरून पाहू लागले एकमेकांकडे!
Emergency Alert Phone: भारतातील बहुतेक स्मार्टफोन शनिवारी सकाळी ११:४२ च्या सुमारास अचानक वाजू लागले. आवाजासोबत एक संदेश दिसला, जो एका सरकारी संस्थेने पाठवला होता. हा संदेश एका चाचणी कार्यक्रमाचा भाग होता.
ADVERTISEMENT

मुंबई: भारतातील बहुतेक स्मार्टफोन आज (2 एप्रिल) सकाळी 11:42 च्या सुमारास अचानक सायरनप्रमाणे एकाच वेळी वाजू लागले. अचानक एसओएस (SOS) चा आवाज आला आणि एक संदेश (Emergency Message)दिसला. हा सायरन आणि इमर्जन्सी मेसेज पाहून अनेक लोकांना आश्चर्य आणि काहीशी भीतीही वाटली.
तो मेसेज नेमका काय?
हा मेसेज सुरुवातील इंग्रजीमध्ये आणि दाक्षिणात्य भाषेत दिसला. नंतर पुन्हा थोड्या वेळाने तशाच पद्धतीचा सायरन वाजला. पण यावेळी तो मेसेज इंग्रजी आणि मराठीमध्ये मोबाइलवर आला होता. या मेसेजमध्ये स्पष्टपणे म्हटले होते की, भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून सेल ब्रॉडकास्ट सेवा सुरू केली आहे.
तात्काळ आपत्कालीन सूचना देण्यासाठी स्वदेशी 'सेल ब्रॉडकास्ट सिस्टम'ची चाचणी घेण्यात आली. चाचणीदरम्यान, मोबाइल फोनवर हे मेसेज इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषांमध्ये प्राप्त झाले. संदेश प्राप्त करणाऱ्यांना चाचणीदरम्यान कोणतीही कृती न करण्याची विनंती देखील करण्यात आली होती.
अनेकांमध्ये पसरली घबराट
एकाच वेळी सगळ्यांचे मोबाइल फोनमधील सायरन वाजू लागल्याने अनेक गर्दीच्या ठिकाणी लोकांमध्ये काहीशी घबराट पाहायला मिळाली. लोकल ट्रेन, बाजार आणि रहदारीची ठिकाणी येथे अनेक जण या सायरनने चलबिचल झाले. पण काही वेळातच हा टेस्टिंग मेसेज असल्याचं समजल्याने लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.









