मिसिंग लिंकला किती कोटींचा खर्च आला? त्याला नाव काय देणार? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले...

मुंबई तक

Devendra Fadnavis on missing link cost : 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे आज (दि.1 मे) मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रकल्पाला लागलेल्या खर्चाबाबत भाष्य केलंय.

ADVERTISEMENT

Devendra Fadnavis on missing link cost
Devendra Fadnavis on missing link cost
google news

बातम्या हायलाइट

point

मिसिंग लिंकला किती कोटींचा खर्च आला?

point

त्याला नाव काय देणार? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले...

Devendra Fadnavis on missing link cost :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थित 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे आज (दि. 1 मे) लोकार्पण करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकल्पबाबत माहिती दिली. शिवाय या प्रकल्पासाठी प्रयत्न केलेल्या लोकांचा अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी या प्रकल्पाला किती कोटींचा खर्च आला याची देखील माहिती दिली. ते काय काय म्हणाले जाणून घेऊयात.. 

आम्ही सगळे मिळून त्याला काय नाव द्यायचं हे ठरवू -  देवेंद्र फडणवीस 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही जे स्वप्न पुणे- मुंबई आणि मुंबई -पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पाहिले होते, त्याचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालेला आहे. आजपासून याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा त्याला कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे. ज्यावेळी आपण याला सुरुवात केली नव्हती, तेव्हा ती मिसिंग लिंक होती. त्यामुळे आता नाव बदललं पाहिजे, त्याला कनेक्टिंग लिंक नाव द्या.. आम्ही सगळे मिळून त्याला काय नाव द्यायचं? हे देखील ठरवणार आहोत. पण आता यामध्ये मिसिंग आता काही नाहीये. मी MSRDC मनापासून अभिनंदन करतो. हा अतिशय आयकॉनिक प्रकल्प तयार झाला. 

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने मिसिंग लिंकमधील टनेलला वायडेस्ट अंडरग्राऊंड टनेलचा दर्जा दिला आहे. आपण जागतिक विक्रम तयार केला आहे. मिसिंग लिंकमुळे मुंबई -पुणे यामधील 6 किलोमीटर अंतर आणि अर्धा तासाचा वेळ कमी होणार आहे. आपण मिसिंग लिंकच्या ज्या पुलावरुन आलो, त्याची उंची 182 मीटर आहे. दरीवर उभारलेला हा पूल म्हणजे एक अभियांत्रिकी चमत्कार आहे. यामुळे रोज कोट्यावधी रुपयांच्या इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे प्रदुषण कमी होणार आहे. लोकांचा वेळ देखील वाचणार आहे. 

मिसिंग लिंकला किती कोटींचा खर्च आला? 

कोविडमध्ये मिसिंग लिंकच्या कामात अडथळे आले. मात्र, नंतरच्या काळात काम सुसाट झाले. 7 हजार 181 कोटी रुपये या प्रकल्पाला लागले आहेत. डिसेंबर 2015 ला जुन्या सरकारचा निर्णय आम्ही बदलला आणि मिसिंग लिंक करण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी 5-7 हजार कोटी रुपये लागणार, असा अंदाज होता. हे आणायचे कुठून? हा देखील प्रश्न होता. त्यावेळी मी सांगितलं की, हा सेल्फ फायनान्स केला पाहिजे. याची सर्व इक्विटी आपल्याला मुंबई-पुणे दरम्यानच्या टोलमधून मिळू शकते. त्याच पद्धतीने आपण याचं काम केलं, असंही फडणवीस यांनी नमूद केलं. 

हे वाचलं का?