'शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती..' बच्चू कडूंची मोठी घोषणा; प्रहार संघटनेचं काय होणार?
बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती..'
बच्चू कडूंची मोठी घोषणा
प्रहार संघटनेचं काय होणार?
Bachhu Kadu Enters in Shivsena, दीपेश त्रिपाठी : विधानपरिषद निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. काल ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली. यानंतर काँग्रेसही विधान परिषद लढवणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केली. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा रंगली आहे. यातच आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्याविषयी महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
विधानपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. आज (30 एप्रिल) सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
का केला प्रवेश?
बच्चू कडू म्हणाले की, काल, परवा झालेल्या चर्चेमध्ये आमचे सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारले आहेत. बच्चू कडूचं काम प्रामाणिकपणे राहील. शिवसेनेची राजकीय ताकद मजबूत करण्याचं काम प्रामाणिकपणे करु. पण त्या बदल्यात आम्हाला शेतकऱ्यांची, दिव्यांगांची ताकद हवी आहे. त्यामध्ये कोणताही समझोता होणार नाही. दिव्यांग मंत्रालयाच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न झाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या लढाईत इंचभरही फरक पडणार नाही.
हे ही वाचा : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ठरला, 'या' माजी मंत्र्याच्या मुलाला संधी
प्रहार संघटनेचं काय होणार?
प्रहार संघटनेचं काय होणार याविषयी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना कायम राहणार. मात्र पूर्ण ताकदीने शिवसेना कशी वाढेल, या अंगातला प्रत्येक रक्ताचा थेंब जितका पक्षासाठी धावणार, तितकाच शेतकरी, मजूर, दिव्यांगासाठी धावणार आहे.









