विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ठरला, 'या' माजी मंत्र्याच्या मुलाला संधी
NCP MLC Candidate : शिवसेना ठाकरे गटाने विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ठरला
'या' माजी मंत्र्याच्या मुलाला संधी
NCP MLC Candidate : राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. झिशान सिद्दिकी हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर जाणार असल्याचे समजते. झिशान सिद्दिकी हे माजी राज्यमंत्री दिवंगत बाबा सिद्दिकी यांचे पुत्र आहेत. दुसरीकडे, शिवसेना UBT गटानेही आपला उमेदवार जाहीर केला आहे. आदित्य ठाकरे यांनी विधानपरिषदेसाठी ठाकरे गटाकडून विधानपरिषदेसाठी अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
महाविकास आघाडीत बिघाडी
अंबादास दानवे यांनी गेल्या काही काळापासून सभागृहात आणि मैदानावर आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडली आहे, त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवण्यात आला आहे. ठाकरे गटाकडून विधानपरिषदेसाठी अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर काँग्रेसनेही उमेदवार देणार असल्याचे सांगितले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही घोषणा केली आहे. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा रंगली आहे.
हे ही वाचा : Exit Poll: प्रत्येकाचा अंदाज चुकवणारा निकाल, प. बंगालमधील एक्झिट पोलमधील धक्कादायक आकडे एकदा पाहाच!
भाजपचे धक्कातंत्र
भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर केला आहे. विधानपरिषदेसाठी भाजपने सुनील कर्जतकर, माधवी नाईक (ठाणे), संजय भेंडे (नागपूर), विवेक कोल्हे (अहिल्यानगर - कोपरगाव), प्रमोद जठार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, आता काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा : बारामती, राहुरीचा Exit Poll; 'रुद्र रिसर्च'ने थेट आकडेच सांगितले.. पाहा कोणाचा किती मतांनी होणार विजय
कधी होणार निवडणूक?
विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल आहे, तर अर्ज माघारीची मुदत 4 मे आहे. मतदानाची प्रक्रिया 12 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत पार पडणार आहे. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतांची मोजणी करुन निकाल जाहीर केला जाईल.









