ममता दीदींची सत्ता तळ्यात-मळ्यात?, धक्का देणारे Exit Poll चे आकडे समोर
West Bengal Election Exit Poll : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2026 पार पडली, पश्चिम बंगाल हा तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, सध्याचे काही एग्जिट पोलचे अंदाज पाहता पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता वर्तवलेली आहे, पण यावर आताच भाष्य करणं योग्य नाही.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2026 एग्जिट पोल
एक्जिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता येणार?
West Bengal Election Exit Poll : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2026 पार पडली, पश्चिम बंगाल हा तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, सध्याचे काही एग्जिट पोलचे अंदाज पाहता पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता वर्तवलेली आहे, पण यावर आताच भाष्य करणं योग्य नाही. पश्चिम बंगाल राज्याच्या निवडणुकीत 91 टक्के नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजावून लोकशाही बळकट केली. पण, आता निवडणुकीनंतर निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. अशातच एग्झिट पोलने वर्तवेले अंदाज हे आश्चर्यकारक आहेत.
हे ही वाचा : विधान परिषद निवडणूक: काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, ठाकरेंच्या उमेदवाराबाबत केली मोठी घोषणा
एक्जिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता येणार?
टूडे चाणक्या एग्जिट पोल
टूडे चाणक्या या एग्जिट पोलने पश्चिम बंगाल निवडणूक 2026 च्या निकालाचा अंदाज वर्तवला. भाजप सर्वाधिक 192 जागांवर विजय मिळवू शकतो असा अंदाज आहे, तर तृणमूल काँग्रेस हा पक्ष 100 जागांवर विजय मिळवेल अशी शक्यता वर्तवण्यात आली. तसेच अन्य 2 जागा, असा टूडे चाणक्या या एग्जिट पोलचा अंदाज आहे.
JVC एग्जिट पोल
याच पश्चिम बंगालमध्ये JVC या एग्जिट पोलने तृणमूल काँग्रेसला 131-152 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तवला. तसेच भाजपला 138 - 159 जागांवर विजय मिळेल, असा JVC या एग्जिट पोलने अंदाज वर्तवला. तसेच काँग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचा एग्जिट पोलचा अंदाज आहे.
P-MARQ एग्जिट पोल
P-MARQ एग्जिट पोलनुसार, तृणमूल काँग्रेस पक्षाला 118-138 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर भाजप 150-175 जागांवर विजय मिळवेल, काँग्रेस पक्षाला भोपळा फोडता येणार नसल्याचा अंदाज आहे.









