'कुणीही मिरवणुका काढू नयेत, गुलाल उधळू नये...', सुनेत्रा पवारांची बारामतीकरांना भावनिक साद; Tweet आलं समोर
Sunetra Pawar : राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक लढली गेली. या निवडणुकीत जवळपास सुनेत्रा पवार विजयी होणार आहेत, यात कोणतीही शंका व्यक्त केली जात नाही, अशातच आता सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना ट्विट करत भावनिक साद घातली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सुनेत्रा पवारांची बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवार यांचं ट्विट जसंच्या तसं
Sunetra Pawar : 'आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया,' असं ट्विट करत राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बारामती पोटनिवडणूक उमेदवार सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांना भावनिक साद घातली आहे.
हे ही वाचा : Baramati Bypoll Result 2026 Live: बारामती पोटनिवडणूक निकाल LIVE, अकराव्या फेरीत सुनेत्रा पवारांना किती मते?
बारामती मतदारसंघाचे दिवंगत आमदार अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला, या दुर्दैवी घटनेनं बारामतीसह देश हळहळला होता. अशातच याच मतदारसंघासाठी पोटनिवडणूक पार पडलीय. या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सुनेत्रा पवार यांना बिनविरोध पाठिंबा दिला. आज पोटनिवडणुकीच्या मतदानाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे, तर बारामतीत सुनेत्रा पवारांनी विजयानंतर मतदारसंघातील मतदारांना भावनिक साद घातली आहे.
सुनेत्रा पवार यांचं ट्विट जसंच्या तसं
'आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते.
आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया.









