'..त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदीजी आहे' भाजपचा मुंबईत विजयी जल्लोष; काय म्हणाले फडणवीस?
'भारतीय जनता पार्टीची निर्मीती ज्यांनी केली ते श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालचे होते. त्यामुळे खरा बंगालचा कुठला पक्ष असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. आणि आज बंगालच्या जनतेने दीदींना दाखवून दिलं बंगालचा खरा पक्ष कुठला आहे.'
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
..त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदीजी आहे
भाजपचा मुंबईत विजयी जल्लोष
काय म्हणाले फडणवीस?
Devendra Fadnavis on BJP Victory : देशात झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचा निकाल समोर आला आहे. पाचपैकी तीन राज्यांमध्ये भाजपने सत्ता स्थापन केली आहे. मुंबईत या विजयाचा जल्लोष भाजपने साजरा केला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी या विजयाचं श्रेय नरेंद्र मोदींना दिलं. ते म्हणाले की, 'मला विश्वास आहे मोदीजींच्या नेतृत्त्वात विजयाचा हा रथ असाच पुढे जात राहील. हा विजय मोदीजींवरच्या विश्वासावरचा विजय आहे.'
बंगालचा खरा पक्ष भाजप
विजयाचा जल्लोष साजरा करताना फडणवीस म्हणाले की, 'आपल्यासाठी हा दिवस ऐतिहासिक आहे. मी बंगालला गेलो होतो तेव्हा तिथल्या एका पत्रकार परिषदेत मला एका पत्रकाराने विचारलं की, ममतादीदी म्हणतात भाजप आणि त्यांचे नेते हे बंगालच्या बाहरचे आहेत. बाहेरचे लोक येऊन याठिकाणी मत मागताहेत. यावर तुमचं मत काय आहे? मी त्यांना सांगितलं आमच्या भारतीय जनता पार्टीची निर्मीती ज्यांनी केली ते श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालचे होते. त्यामुळे खरा बंगालचा कुठला पक्ष असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. आणि आज बंगालच्या जनतेने दीदींना दाखवून दिलं बंगालचा खरा पक्ष कुठला आहे.'
ते म्हणाले की 'बंगालच्या लोकांनी ज्याप्रकारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेऊन केवळ परिवर्तन नाही तर बंगालमध्ये महापरिवर्तन करुन दाखवलं. आता दोन तृतीयांश बहुमत बंगालमध्ये भाजपला मिळतंय. बंगाल असेल, आसाम असेल, पुदुच्चेरी असेल हा विजय भारतातील जनाजनाचा मोदीजींवर असलेल्या विश्वासाचा विजय आहे. आजही देशात जनतेला एकच गोष्ट माहितीये आणि ती गोष्ट म्हणजे मोदी है तो मुमकिन है.'
हे ही वाचा : सुनेत्रा पवारांचं देशात सर्वात मोठं लीड, अजितदादांसह भाजपच्या 2 आमदारांचा विक्रम मोडला
मोदींच्या माध्यामातून हजारो कोटींची कामं
यापुढं बोलताना ते म्हणाले की, एकीकडे दीदींचं कुशासन होतं आणि दुसरीकडे मोदीजींच्या माध्यमातून बंगालमध्ये हजारो कोटी रुपयांची कामं चालली होती. रस्त्याची कामं, हायवेची कामं, गुंतवणूक मोठ्या प्रमाणात मेट्रोची कामं त्यामुळं जनतेला हा विश्वास बसला तर कोणी जर बंगालमध्ये परिवर्तन घडवू शकतं त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदीजी आहे.









