तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलापतिची 'विजयी' वाटचाल, सोनं, साड्या बरंच काही; मतदारांना दिली 'ही' 5 आश्वासने
Vijay TVK : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या कलांनुसार, अभिनेता विजय टीव्हीके पक्ष विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. 243 सदस्यांच्या तामिळनाडू विधानसभेत त्यांचा पक्ष हा 100 हून अधिक जागा मिळणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आता याच विजयने 2024 रोजी राजकारणार प्रवेश केला. त्याने केलेल्या अश्वासनाने तामिळनाडूत मोठी खळबळ उडाल्याचं चित्र होतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलापतिची विजयी वाटचाल
विजयने निवडणुकीदरम्यान दिलेली 5 मोठी आश्वासने
Vijay TVK : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या कलांनुसार, अभिनेता विजय टीव्हीके हा पक्ष विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. 243 सदस्यांच्या तामिळनाडू विधानसभेत त्यांचा पक्ष हा 100 हून अधिक जागा मिळवेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याच विजयने 2024 रोजी राजकारणार प्रवेश केला. त्याने दिलेल्या अश्वासनाने तामिळनाडूत मोठी खळबळ उडाल्याचं चित्र होतं, मतदानापूर्वी त्याने मुलींना त्यांच्या लग्नावेळी 8 ग्रॅम सोने आणि महिलांना सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले. तामिळनाडूतील निकाल पाहता, दिलेलं आश्वासन हे विजयचे श्रेय असल्याचं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. अशातच विजयने निवडणुकीदरम्यान दिलेली 5 मोठी आश्वासने पुढीलप्रमाणे...
हे ही वाचा : 'कुणीही मिरवणुका काढू नयेत, गुलाल उधळू नये...', सुनेत्रा पवारांची बारामतीकरांना भावनिक साद; Tweet आलं समोर
विजयने निवडणुकीदरम्यान दिलेली 5 मोठी आश्वासने
1) विजयने आपल्या जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली, तामिळनाडुतील प्रत्येक मुलील लग्नानंतर सरकारकडून 8 ग्रॅम सोनं म्हणून शासकीय सहाय्यक मदत दिली जाईल. सोन्यासोबतच, विजयने मुलींना लग्नानंतर रेशमी साडी देण्याचे आश्वासन दिले होते.
2) आपल्या जाहीरनाम्यात, विजयने यांच्या पक्षाने महिलांना अडीच हजार मासिक आर्थिक मदतीची घोषणा केली होती. तसेच, ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी दरमहा 3 हजारांपर्यंत पेन्शन वाढ करण्याचा निर्णय घेतला.
3) तसेच त्यांनी वचन दिले होते की, त्यांच्या पक्ष सत्तेवर आल्यानंतर ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांना जमिनीचे मोफत पट्टे दिले जातील.









