Impact feature: सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ‘महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स लीग’चा भव्य शुभारंभ

मुंबई तक

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज मुंबईतील एमसीए क्लब, बीकेसी येथे ‘महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स लीग’ (MTCCL) चा भव्य शुभारंभ माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत पार पडला.

ADVERTISEMENT

grand launch of the maharashtra tennis cricket champions league in the presence of sunil gavaskar
Maharashtra Tennis Cricket Champions League
google news

मुंबई: महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज मुंबईतील एमसीए क्लब, बीकेसी येथे ‘महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स लीग’ (MTCCL) चा भव्य शुभारंभ पार पडला. या सोहळ्याला भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, करसन घावरी आणि अमोल मजूमदार यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली.

लीगची रूपरेषा

एकनाथ सोलकर फाउंडेशन आणि रोज मर्क लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या लीगमध्ये महाराष्ट्रातील पहिल्या प्रीमियर टेनिस क्रिकेट लीग अंतर्गत ८ संघांचा समावेश असणार आहे. आतापर्यंत या संघांचे ८ कर्णधार निश्चित झाले असून, उर्वरित खेळाडूंची निवड आगामी दिवसांत लिलाव पद्धतीद्वारे करण्यात येणार आहे.

सन्मान आणि आदरांजली

या कार्यक्रमादरम्यान भारताच्या माजी क्रिकेटपटूंना सन्मानित करण्यात आले. तसेच, स्वर्गीय एकनाथ सोलकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

आयोजन आणि व्यवस्थापन

एकनाथ सोलकर फाउंडेशन आणि रोज मर्क लिमिटेड आयोजित या लीगला ITCSF चे संलग्नत्व असून, याचे संस्थापक ब्रिजेश सोलकर आणि भूपेंद्र सिन्हा आहेत, तर सहसंस्थापक भरत लोहार आणि प्रवीण घेवरी आहेत.

हे वाचलं का?