Govt Jobs : भारतीय टपाल खात्यात 23 हजारहून अधिक जागांची भरती, लगेच करा अर्ज

मुंबई तक

भारतीय टपाल विभागाने 23 हजारांहून अधिक पदांसाठी भरती सुरु केली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर आहे.

ADVERTISEMENT

GDS Recruitment
GDS Recruitment
Google CTA

बातम्या हायलाइट

point

भारतीय टपाल खात्यात 23 हजारहून अधिक जागांची भरती

point

लगेच करा अर्ज

GDS Recruitment : भारतीय टपाल विभागाच्या ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) भरती 2026 ची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. याअंतर्गत देशाभरातील विविध मंडळे आणि विभागांमधील ग्रामीण टपाल कार्यालयांमध्ये एकूण 23,757 जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये ब्रांच पोस्टमास्तर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्टमास्तर (ABPM) आणि डाक सेवक या तीन प्रमुख पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण केलेले असणे अनिवार्य आहे. उमेदवाराने 10 वीमध्ये गणित आणि इंग्रजी या विषयांत उत्तीर्ण गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे; इतर कोणत्याही समकक्ष शैक्षणिक अर्हता स्वीकारल्या जाणार नाहीत. याशिवाय, उमेदवाराने संबंधित मंडळाच्या नियमांनुसार किमान 10 वीपर्यंत स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला असणे गरजेचे आहे.

हे ही वाचा : प्रेमप्रकरणातून गर्लफ्रेंडची हत्या, बॉयफ्रेंडनं मृतदेह पोत्यात भरून दुचाकीवरून फिरवला

असा करा अर्ज

शैक्षणिक पात्रतेसोबतच उमेदवारांना काही अतिरिक्त कौशल्ये आणि अटींची पूर्तता करावी लागेल. उमेदवाराला संगणकाचे ज्ञान आणि सायकल चालवता येणे आवश्यक आहे. तसेच, निवड झाल्यानंतर पदभार स्वीकारताना जीडीएस भत्त्यांव्यतिरिक्त स्वतःच्या उदरनिर्वाहाचे पुरेसे साधन असल्याबाबतचे हमीपत्र (Undertaking) सादर करणे बंधनकारक राहील. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (indiapost.gov.in) केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी नोंदणी सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 21 सप्टेंबर आहे.

हे ही वाचा : लातूर हादरलं! प्रसिद्ध संस्थाचालकाने स्वत:वर गोळीबार करत संपवलं जीवन

वेतन किती?

या पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांना टपाल विभागाच्या नियमांनुसार आकर्षक मासिक वेतन आणि भत्ते दिले जातील. ब्रांच पोस्टमास्तर (BPM) या पदासाठी सुरुवातीचा टाइम रिलेटेड कन्टीन्यूटी अलाउन्स (TRCA) स्लॅब 12,000 ते 29,380 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आला आहे. तर असिस्टंट ब्रांच पोस्टमास्तर (ABPM) आणि डाक सेवक या पदांसाठी सुरुवातीचा TRCA स्लॅब 10,000 ते 24,470 रुपये इतका राहील. ग्रामीण भागात सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी असून, इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.