लहान बहिणीसोबत अश्लील चाळे, शिक्षिकेलाही..., चौथीत शिकणारा मुलगा असं का वागला?
गोरखपूरमधील एक चौथीत शिकणारा मुलगा आपल्या लहान बहिणीसोबत अश्लील चाळे करताना आईला सापडला. त्यानंतर पुढील तपासात एक भयंकर गोष्ट समोर आली. यामुळे मुलांना मोबाईल द्यावा का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लहान बहिणीसोबत अश्लील चाळे
शिक्षिकेचीही काढली आक्षेपार्ह चित्रे
काय आहे बॉर्डरलाईन पर्सनालिटी डिसऑर्डर?
Crime News : चौथीत शिकणाऱ्या एका चिमुकल्याच्या कृत्याने पालकांसह सगळेच जण हादरुन गेले आहेत. ऑनलाईन अभ्यासाच्या नावाखाली हातात आलेला मोबाईल कधी त्याचे नुकसान करणारा ठरला, हे पालकांच्या लक्षातच आले नाही. मोबाईलवर मुलाला अश्लील कंटेंट आणि पॉर्न पाहण्याचे भयानक व्यसन लागले. मुलाच्या वागण्यातील बदल जेव्हा पराकोटीला पोहोचले, तेव्हा त्याने आपल्याच बहिणीसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. अचानक आईने हे पाहिल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. चौकशी केली असता समोर आले की, हा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नव्हता; तर शाळेतही एका शिक्षिकेची आक्षेपार्ह चित्रे काढल्यामुळे त्याला आधीच शाळेतून काढून टाकण्यात आले होते. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील ही घटना आहे.
वागण्यात कशी आली अश्लीलता?
मिळालेल्या माहितीनुसार, या मुलाला ऑनलाईन क्लाससाठी मोबाईल देण्यात आला होता. सुरुवातीला अभ्यासाच्या मध्ये तो थोडा वेळ गेम खेळायचा, पण गेल्या सहा महिन्यांत मोबाईल त्याच्या शरीराचा एक भागच बनला. मोबाईल हिसकावून घेतला की तो आरडाओरडा करायचा, तासनतास बाथरूममध्ये मोबाईल घेऊन बसून राहायचा आणि विचारल्यास प्रचंड चिडचिड करायचा. हळूहळू या डिटल व्यसनाने त्याच्या मनावर पूर्ण ताबा मिळवला आणि त्याला योग्य-अयोग्यतेचा विसर पडला. शाळेतील वर्गमित्रांच्या सांगण्यानुसार तो सातत्याने अश्लील गप्पा मारायचा. अखेर, प्रशासनाने त्याचे नाव शाळेतून कमी करत त्याच्यावर तातडीने उपचार करण्याचा सल्ला पालकांना दिला.
हे ही वाचा : लातूर हादरलं! प्रसिद्ध संस्थाचालकाने स्वत:वर गोळीबार करत संपवलं जीवन
मानसिक आजाराचा बळी
तज्ज्ञांच्या मते, हा मुलगा ही कृत्यं जाणूनबुजून करत नसून तो 'बॉर्डरलाईन पर्सनालिटी डिसऑर्डर' (BPD) या गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त आहे. या मानसिक स्थितीत व्यक्ती स्वतःच्या भावनांवर, क्रोधावर आणि आवेगावर ताबा ठेवू शकत नाही. त्यांचे मूड क्षणाक्षणाला बदलतात, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिक संतुलनावर, आत्मप्रतिमेवर आणि नात्यांवर होतो. असाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला होता, जिथे BPD ग्रस्त एका तरुण अभियंत्याने आपल्या वडिलांकडे स्वतःचे लिंग बदलून मुलगी बनण्याचा हट्ट धरला होता. सध्या या चिमुकल्या मुलावर मानसोपचार सुरू आहेत.
हे ही वाचा : जालना: चॉकलेटचं आमिष दाखवून 6 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, कुदळ फावड्याने घरावर हल्ला
मोबाईलपासून सावधान
आजच्या डिजिटल युगात आपल्या लहान मुलांच्या हातात सहज मिळणारा मोबाईल फोन आणि इंटरनेटचा अनियंत्रित वापर किती धोकादायक ठरू शकतो, याचे हे एक अत्यंत भयंकर उदाहरण आहे. मुलांच्या मोबाईल वापराकडे वेळेत लक्ष दिले नाही, तर हा स्क्रीन टाईम त्यांना अशा असाध्य आणि विकृत मानसिक आजारांच्या गर्तेत ढकलू शकतो. त्यामुळे आताच सावध व्हा! आपल्या पाल्याच्या बदललेल्या स्वभावाकडे किंवा मोबाईलच्या अति व्यसनाकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर भविष्यात तुमच्यावरही समाजात मान खाली घालण्याची वेळ येऊ शकते.
