जालना: चॉकलेटचं आमिष दाखवून 6 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, कुदळ फावड्याने घरावर हल्ला
Jalna crime news : जालन्यात एका 6 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आहे. या घटनेनंतर जालन्यातीलस रामनगर परिसरात लोकांमध्ये आक्रोश निर्माण झाल्याचे वृत्त आहे. आरोपीने चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यासोबत गैरकृत्य केल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
चिमुकलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीवर पोलीस ठाण्यात तक्रार
नागरिकांना संताप अनावर कुदळ, फावड्याने घरावर हल्ला
Jalna Crime News : जालन्यात एका 6 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आहे. या घटनेनंतर जालन्यातीलस रामनगर परिसरात लोकांमध्ये आक्रोश निर्माण झाल्याचे वृत्त आहे. आरोपीने चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यासोबत गैरकृत्य केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पीडितेनं घडलेल्या घटनेची कुटुंबीयांना माहिती दिली होती. या प्रकरणात आरोपीची दिनेश सुवर्णकार (वय 60) अशी ओळख समोर आली आहे. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे.
हे ही वाचा : Astrology : आज 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस, कष्टाचं होणार चीज
चिमुकलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीवर पोलीस ठाण्यात तक्रार
या घटनेनंतर पीडितेनं कुटुंबीयांना घडलेल्या घटनेची माहिती सांगितली होती. त्यानंतर पीडितेच्या आईने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पीडितेच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू ठेवण्यात आलाय. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर स्थानिकांनी घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
नागरिकांना संताप अनावर
संबंधित आरोपीला लोकांच्या हवाली करा अशी नागरिकांनी मागणी केली होती. या प्रकरणी नागरिकांसोबत माजी आमदार कैलास गोरंट्याल पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी आंदोलन केले. यादरम्यान, आरोपीला ताब्यात घेऊन नागरिकांच्या हवाली करा अशी मागणी करण्यात आली होती. यानंतर नागरिकांनी राग व्यक्त करत आरोपीच्या घराबाहेर पोहोचले होते. नागरिकांच्या हातात फावडे, कुदळ आणि लाकडी दांडे होते, त्यांनी आरोपीच्या घराचा काही भाग पाडला. या घटनेनंतर परिसरात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात 'या' जिल्ह्यांत पाऊस सक्रिय, कुठे मध्यम तर... IMD चा अलर्ट
एका निष्पाप मुलीच्या कथित शोषणाप्रकरणी आरोपीवर कठोरतम कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.
