जुन्या गर्लफ्रेंडला भेटायला गेला तरुण, नवऱ्यानं प्रियकराला संपवलं

मुंबई तक

Crime News : एक्स गर्लफ्रेंडच्या नवऱ्याने आपल्या साथीदारासोबत मिळून पत्नीच्या प्रियकराला संपवलं. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक करण्यात आली.

ADVERTISEMENT

crime news (AI Photo)
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

एक्स गर्लफ्रेंडच्या नवऱ्याने साथीदारासोबत मिळून पत्नीच्या प्रियकराला संपवलं

point

आरोपींच्या आवळल्या मुसक्या

Crime News : उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील बछरावा पोलीस ठाणे क्षेत्रातील एका गावात धक्कादायक प्रकार घडला. गावातील पाटलाच्या मुलगा रमाकांत हा आपल्या एक्स गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गेला होता. यावेळी एक्स गर्लफ्रेंडच्या नवऱ्याने आपल्या साथीदारासोबत मिळून पत्नीच्या प्रियकराला संपवलं. गर्लफ्रेंडच्या नवऱ्याची सुरेंद्र अशी ओळख आली आहे. या प्रकरणी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. 

हे ही वाचा : प्रेमप्रकरणातून गर्लफ्रेंडची हत्या, बॉयफ्रेंडनं मृतदेह पोत्यात भरून दुचाकीवरून फिरवला

''पोलिसांनीच आम्हाला ठार मारण्यास सांगितले''

घटनेनंतर तात्काळ सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत पीडित तरुण रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली. घटनास्थळी उपस्थित असलेली ग्रामीण महिला ही तरुणासोबत सतत चर्चा करत होती. दरम्यान, व्हिडिओत तरुणाची सुरेंद्र आणि तरुणीची सोनी अशी ओळख समोर आली होती. ग्रामस्थांनी विचारपूस केल्यानंतर सुरेंद्र म्हणाला की, पोलिसांनीच आम्हाला ठार मारण्यास सांगितले होते, म्हणून आम्ही मारले. पोलिसांनी जे योग्य वाटेल ते करण्यास सांगितलं होते. 

रमाकांतकडून महिलेचा छळ 

संबंधित प्रकरणात आरोपींनी दावा केला की, रमाकांत बऱ्याच काळापासून महिलेचा छळ करत होता आणि याबाबत पोलिसांत तीनदा तक्रार दाखल केली होती. त्यांनी पुढे सांगितलं की, सुमारे सहा महिन्यांपूर्वी तक्रार दाखल करण्यात आली होती, परस्पर सामंजस्याने तोडगा देखील काढण्यात आला होता. 

हे ही वाचा : लातूर हादरलं! प्रसिद्ध संस्थाचालकाने स्वत:वर गोळीबार करत संपवलं जीवन

सोनी आणि रमाकांत यांच्यात जवळीकता

दरम्यान, सोनीचे अमितसोबत 2010 मध्ये विवाह झाला होता, मात्र, नंतर त्यांचा घटस्फोट झाला होता. दरम्यान, सोनी आणि रमाकांत यांच्यात जवळीकता वाढू लागली होती. नंतर सोनीने सुरेंद्रशी विवाह केला. शनिवारी, रमाकांत सोनीला भेटण्यास खैरहानी येथे गेला असता, त्यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता आणि सुरेंद्रवर मोठा हल्ला करण्यात आला होता.