सुनेत्रा पवारांचं देशात सर्वात मोठं लीड, अजितदादांसह भाजपच्या 2 आमदारांचा विक्रम मोडला
Sunetra Pawar Record : बारामती पोटनिवडणुकीचा मतदानाचा आज 4 मे 2026 रोजी निकाल जाहीर झाला. बारामतीचे दिवंगत आमदार अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची ही पोटनिवडणूक पार पडली. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केला आणि बारामतीकरांना सुनेत्रा पवार यांना भरघोस मतदान करून मोठा कौलच दिलाय. सुनेत्रा पवारांनी मोठा अजितदादांसह दोन भाजपच्या आमदाराचा रेकॉर्ड मोडित काढला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सुनेत्रा पवारांनी अजितदादांचा मोडला विक्रम
देशातील सर्वाधिक मत मिळवणाऱ्या सुनेत्रा पवार
Sunetra Pawar Record : बारामती पोटनिवडणुकीचा मतदानाचा आज 4 मे 2026 रोजी निकाल जाहीर झाला. बारामतीचे दिवंगत आमदार अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची ही पोटनिवडणूक पार पडली. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केला आणि बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांना भरघोस मतदान करून मोठा कौलच दिलाय. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांचा देखील रेकॉर्ड मोडीत काढला, तसेच दोन भाजपच्या आमदारांचा विक्रम मोडला आहे.
हे ही वाचा : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलापतिची 'विजयी' वाटचाल, सोनं, साड्या बरंच काही; मतदारांना दिली 'ही' 5 आश्वासने
राज्यात सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम करणारे उपमुख्यमंत्री अशी अजित पवार यांची ओळख होती. त्यांनी 2019 मध्ये एक लाख 65 हजार 265 मताधिक्याने विजय मिळवला होता. राज्यात सर्वाधिक लीड मिळवणारे आमदार अशी त्यांची ओळख होती. दरम्यान, अजितदादांनी तत्कालीन भाजप उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा मोठं अंतर राखून पराभव केला होता.
सुनेत्रा पवारांनी अजितदादांचा मोडला विक्रम
मात्र, उत्तर प्रदेशात 2022 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दोन नेत्यांनी अजितदादांचा विक्रम मोडीत काढला होता. अशातच आता नवनिर्वाचित आमदार सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांसह आता भाजपच्या आमदारांना मागे सोडलं आणि देशातील सर्वाधित मत मिळवणाऱ्या आमदार असल्याचा विक्रम नोंदवला.
हे ही वाचा : Baramati Bypoll Result 2026 Live: बारामती पोटनिवडणूक निकाल LIVE, सुनेत्रा पवार ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर
देशातील सर्वाधिक मत मिळवणाऱ्या सुनेत्रा पवार
2019 मध्ये दादांनी मोठा विक्रम केला होता, हा विक्रम 2022 मध्ये उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत गाझियाबादच्या साहिबाबादचे भाजपचे आमदार सुनील शर्मा आणि नोएडाचे भाजपचे आमदार पंकज सिंह यांचा अधिक मत मिळण्यात समावेश होता. या दोघांनी समाजवादी पार्टी या पक्षाच्या अमरपाल शर्मा यांचा 2 लाख 14 हजार 835 मतांनी विजय केला होता. तर आता सुनेत्रा पवार यांना 2 लाख 18 हजार 930 मते मिळाली आहेत. सर्वाधिक मते मिळवणाऱ्या उमेदवार अशी त्यांची ओळख झाली आहे.









