Ajit Pawar Death : 'जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारे नेते..' अजित पवारांबद्दल राज ठाकरेंची भावूक पोस्ट

मुंबई तक

Raj Thackeray on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (दि.28) सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू झालाय. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून अजितदादांच्या जाण्याने राज्यातील अनेक नेत्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत. संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. दरम्यान, अजितदादांबद्दल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.  राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारे ते नेते असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

Raj Thackeray on Ajit Pawar
Raj Thackeray on Ajit Pawar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारे नेते..'

point

अजित पवारांबद्दल राज ठाकरेंची भावूक पोस्ट

Raj Thackeray on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (दि.28) सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू झालाय. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून अजितदादांच्या जाण्याने राज्यातील अनेक नेत्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत. संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. दरम्यान, अजितदादांबद्दल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.  राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारे ते नेते असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : एकनाथ शिंदेंना अश्रू अनावर... 'माझा मोठा भाऊ हरपला, आमच्या सहकाऱ्याचा जीव गेलाय, अपघाताची चौकशी व्हायला पाहिजे'

राज ठाकरेंची पोस्ट जशीच्या तशी

माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला. 

अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp