Ajit Pawar यांच्या विमान अपघाताचं CCTV फुटेज आलं समोर, शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?
Ajit Pawar plane crash cctv footage: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (28 जानेवारी) विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. याच अपघाताचं आता सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP)नेते अजित पवार यांचा आज सकाळी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात विमानातील सर्व प्रवासी आणि चालक दलातील सदस्यांचा मृत्यू झाला असून, एकूण 5 जणांचा बळी गेला आहे, ज्यात अजित पवार यांच्यासह 4 अन्य व्यक्तींचा समावेश आहे. हा अपघात मुंबईहून बारामतीकडे येत असलेल्या चार्टर्ड विमानाचा असून, विमान बारामती येथील धावपट्टीवर उतरण्याऐवजी नजीकच्या एका शेतात कोसळलं. ज्यामध्ये विमानातील सर्वांचाच मृत्यू झाला. याच अपघाताचा आता CCTV फुटेजही समोर आलं आहे.
अपघाताची पार्श्वभूमी आणि तपशील
अजित पवार हे मुंबईहून बारामतीला चार जाहीर सभांसाठी निघाले होते. विमान हे व्हीएसआर एव्हिएशन कंपनीचे बॉम्बार्डियर लियरजेट 45 (रजिस्ट्रेशन नंबर VT-SSK) होते.
हे ही वाचा>> Ajit Pawar Death : 'त्या' एका वस्तूमुळे अजितदादांची बॉडी ओळखता आली, न पाहावणारी दृश्य
हे विमान बारामती विमानतळावर उतरण्याच्या दुसऱ्या प्रयत्नात ते रनवेपासून दूर भरकटले आणि आपलं नियंत्रण गमावून बसले. ज्यामुळे धावपट्टीवर उतरण्याऐवजी विमान हे थेट शेतात खाली कोसळलं. विमान कोसळताच त्याला प्रचंड मोठी आग लागली.
हा अपघात सकाळी अंदाजे 8:45 वाजता घडला असून, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक दोष, खराब हवामान किंवा पायलटची चूक या सगळ्या शक्यता सध्या व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी एयरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AIB) ची टीम बारामतीला रवाना झाली आहे. डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA)नेही अपघाताची पुष्टी केली आहे.










