अजित पवारांचं विमान क्रॅश होण्यापूर्वी 'क्रू'चे अंतिम शब्द काय होते? DGCA च्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती
बारामतीत झालेल्या विमान अपघाताची चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघातापूर्वी फ्लाइट क्रूचे शेवटचे शब्द होते - 'Oh Sh*t...' हेच शेवटचे शब्द 'फ्लाइट क्रू'च्या बोलण्यात ऐकू आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अजित पवारांचं विमान क्रॅश होण्यापूर्वी 'क्रू'चे अंतिम शब्द काय होते?
DGCA च्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती
Baramati plane crash: बारामतीत झालेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह त्यांच्यासोबत असलेल्या पाच लोकांना आपला जीव गमवावा लागला. आता या अपघाताची चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघातापूर्वी फ्लाइट क्रूचे शेवटचे शब्द होते - 'Oh Sh*t...' हेच शेवटचे शब्द 'फ्लाइट क्रू'च्या बोलण्यात ऐकू आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
विमान अचानक कोसळल्याने आग लागली...
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून उड्डाण घेतलेल्या आणि बारामती विमानतळावर लॅन्ड होणाऱ्या या विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅप्टन सुमित कपूर आणि को-पायलट कॅप्टन संभावी पाठक, तसेच सुरक्षा अधिकारी विदीप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विमान धावपट्टीच्या शॉर्ट ऑफ द थ्रेशोल्ड कोसळलं. याचाच अर्थ विमान हे एअरपोर्टच्या हद्दीत उतरलं, परंतु अचानक खाली कोसळल्याने आग विमानाला आग लागली.
दुसऱ्यांदा लँडिंगच्या प्रयत्नात विमानाचं नियंत्रण सुटलं
बारामती एअरपोर्टची ग्राउंड कंट्रोल सुविधा ही रेडबर्ड एव्हिएशन (Redbird Aviation) आणि कार्व्हर एव्हिएशन (Carver Aviation) या शहरातील दोन खाजगी एव्हिएशन अकादमीतील पायलट कॅडेट्सद्वारे चालवली जाते. ग्राउंड कंट्रोलशी क्रूचा संपर्क होता. DGCA अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितलं की, दुसऱ्यांदा लँडिंगच्या प्रयत्नात विमानाचं नियंत्रण सुटले. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट Flightradar24 नुसार, हा दुसरा लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाला. या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमान जमिनीवर कोसळताच त्याला मोठी आग लागली. एकामागून एक चार-पाच स्फोट झाले आणि परिसरातील लोकांना मोठ्या धमाक्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर, लोक प्रचंड घाबरले. त्यावेळी, घटनास्थळी उपस्थित असलेले स्थानिक म्हणाले की, विमान पूर्णपणे जळालं होतं आणि ते दृश्य अतिशय भयानक होतं.
हे ही वाचा: शेवटची 'ती' 26 मिनिटं, Runway समोर असूनही... लँडिंगपूर्वी अजित पवारांच्या विमानात नेमकं काय घडलं?
दरम्यान, या भीषण घटनेबद्दल अधिकाऱ्यांनी सांगितलं की, विमान रनवेपासून खूपच कमी अंतरावर कोसळलं त्यामुळे एअरस्ट्रिपच्या आतच ही दुर्घटना घडली. मात्र, विमानांचं नियंत्रण कसं सुटलं? हे अद्याप समोर आलेलं नाही. आता, तपास यंत्रणा या बाबीचा तपास करत असून लॅन्डिंगच्या वेळचं हवामान, रनवेची स्थिती आणि पायलटचे निर्णय या गोष्टींचा देखील विचार केला जाणार आहे. या विमानातील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, विमान परिचारिका पिंकी माळी, पायलट आणि को-पायलट यांचा समावेश आहे.










