बीड : 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून खांबाला बांधलं, 'त्या' कारणावरून नवऱ्यासह सासू-सासऱ्यांच्या अडचणीत वाढ

मुंबई तक

Beed crime : बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत एका 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला गावातील एका चावडीत बांधले. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या घटनेनं महाराष्ट्रभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 10 मार्चच्या रात्री घडलेल्या घटनेनं संतापाची लाट उसळल्याचे चित्र आहे.  या प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. 

ADVERTISEMENT

Beed crime
Beed crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

17 वर्षीय मुलीच्या अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट

point

'त्या' कारणावरून पीडितेचे सासू-सासरे, ग्रामसेवक आणि सरपंचावर कारवाईची टांगती तलवार

Beed Crime : बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत एका 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला गावातील एका चावडीत बांधले. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या घटनेनं महाराष्ट्रभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 10 मार्चच्या रात्री घडलेल्या घटनेनं संतापाची लाट उसळल्याचे चित्र आहे.  या प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. 

हे ही वाचा : '...मग गॅस सिलिंडरसाठी रांगा का?' उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांसह केंद्र सरकारला थेट सवाल

पीडितेचा विवाह हा बालवयात झाल्याची माहिती याच प्रकरणामुळे समोर आली. यामुळे पती, सासू-सासरे आणि तत्कालीन विवाहावेळी जे ग्रामसेवक आणि सरपंच होते त्यांनावर देखीलर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबरोबरच पुढील तपासात पतीच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गंभीर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो अशी माहिती बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी दिली.

नेमकं काय घडलं होतं? 

बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे परिसरात माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका अल्पवयीन मुलीला घरातून मध्यरात्री अपहण करून तिच्यावर अत्याचार केला होता. नंतर तिला गावातील एका सार्वजनिक चावडीवर खांबाला बांधून ठेवण्यात आला होता. ही घटना 10 मार्च रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. 

नराधमाचं नाव वैभव गिताराम पटेकर याने रात्री तीन वाजता घरात प्रवेश केला. त्याने पीडितेचं तोंड दाबले आणि तिच्यावर बळजबरी केली आणि एका नदी किनारी नेऊन तिच्यावर पाशवी आत्याचार केले होते. यामुळे पीडितेला मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही स्तरावर प्रचंड यातना भोगाव्या लागल्या आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp