दारुच्या नशेत आख्खं बिहारी कुटुंब संपवलं; मृतदेहाचे तुकडे करुन कचऱ्यात फेकले , मित्रांनीच केला घात

मुंबई तक

Crime News : उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झालेल्या एका बिहारी कुटुंबाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि त्यांच्या दीड वर्षाच्या मुलाला संपवण्यात आल्याने खळबळ उडाली. पती आणि मुलाच्या मृतदेहाचे तुकडे करुन कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकले; तर पत्नीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दारुच्या नशेत आख्खं बिहारी कुटुंब संपवलं

point

मृतदेहाचे तुकडे करुन कचऱ्यात फेकले

Crime News : उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झालेल्या एका बिहारी कुटुंबाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि त्यांच्या दीड वर्षाच्या मुलाला संपवण्यात आल्याने खळबळ उडाली. पती आणि मुलाच्या मृतदेहाचे तुकडे करुन कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकले; तर पत्नीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. चेन्नईच्या अदियाल भागात ही घटना घडली. मूळचे बिहारमधील असलेले हे कुटुंब कामाच्या निमित्ताने चेन्नईला स्थलांतरित झालं होतं. या हत्याकांडातील आरोपी हेदेखील बिहारचेच आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा : भाडेकरुंच्या गोड बोलण्याला भुलली! पण घडलं असं की मालकिणीला गमवावा लागला जीव; वाचा नेमकं काय घडलं?

मित्रांनीच केला घात

या प्रकरणातील आरोपी उपेंद्र यादव याने गौरवला कामासाठी चेन्नईला नेले होते. त्यासाठी 28 वर्षीय गौरव यादव, त्याची पत्नी मोनी कुमारी हे त्यांच्या दीड वर्षाचा मुलगा गुड्डूसह चेन्नईला स्थलांतरित झाले. हे कुटुंब चेन्नईमध्ये एका ओळखीच्या व्यक्तीकडे राहत होते. 25 जानेवारी रात्री गौरव त्याच्या मित्रांसोबत दारू प्यायला. त्याचे मित्र देखील बिहारचे होते आणि ते चेन्नईमध्य मजूर म्हणून काम करत होते. दारू पिण्याच्या पार्टीदरम्यान या मित्रांची नियत बिघडली. त्यांनी गौरवची पत्नी मोनी कुमारीसोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. गौरवने प्रतिकार केला तेव्हा आरोपींनी त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. यामध्ये गौरवचा जागीच मृत्यू झाला. आपले पितळ उघडे पडू नये यासाठी आरोपींनी गौरवची पत्नी आणि तिथे उपस्थित असलेल्या त्याच्या निष्पाप मुलालाही निघृणपणे ठार मारले. त्यानंतर त्यांनी मृतदेहांचे तुकडे केले आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकले. 

हत्येच्या बातमीने गाव सुन्न, चुलीही पेटवल्या नाहीत

गौरवचे कुटुंब हे मूळचे बिहारमधील शेखपुरा येथील पफलाघर गावचे रहिवासी होते. गौरवच्या वडिलांनी सांगितले की, या हत्येतील आरोपी बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील उपेंद्र यादव गौरवला कामासाठी चेन्नईला घेऊन गेला होता. गौरव चेन्नईत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. दरम्यान, या कुटुंबाच्या हत्येनंतर त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या हत्येची बातमी समजल्यानंतर गावातील अनेक घरांमध्ये चुलीही पेटल्या नाहीत. तीनच वर्षांपूर्वी गौरवचे लग्न झाले होते. गावात काम नसल्याने उपेंद्रच्या सांगण्यावरुन गौरव चेन्नईला गेला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp