तरुणी प्रेमात आंधळी झाली, प्रेमाला होता विरोध.. इंजेक्शनमध्ये विष घालून आई-वडिलांचा खेळच खल्लास
crime news : प्रेमात आंधळ्या झालेल्या तरुणीने आपल्याच आई वडिलांना इंजेक्शन देऊन त्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आहे. तरुणीच्या आई वडिलांनी प्रेमाला विरोध केल्यानं हे कृत्य घडल्याची माहिती समोर आली, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सुरेखाचा प्रेमसंबंधाला कुटुंबियांचा होता विरोध
मुलीनंच आई वडिलांना इंजेक्शनमधून दिलं विष
Crime News : तेलंगणात एक मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमात आंधळ्या झालेल्या तरुणीने आपल्याच आई वडिलांना इंजेक्शन देऊन त्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आहे. तरुणीच्या आई वडिलांनी प्रेमाला विरोध केल्यानं हे कृत्य घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. आरोपी तरुणीचे नाव नक्कला सुरेखा असे आहे.
हे ही वाचा : 'भाजपकडून अजितदादांना श्रद्धांजलीच्या पानभर जाहिराती, संजय राऊत यांचा भाजपवर संताप
सुरेखाचा प्रेमसंबंधाला कुटुंबियांचा होता विरोध
नक्कला सुरेखाचे काही काळापासून एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. तरुणी तिच्या बॉयफ्रेंडशी विवाह करू इच्छित होती. तिच्या नातेवाईकांनी या नात्याला विरोध दर्शवला होता, यामुळे घरी मोठा वाद उफळायचा. शेजाऱ्यांनी सांगितलं की, कुटुंबातील वादाने तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
मुलीनंच आई वडिलांना इंजेक्शनमधून दिलं विष
तपासानंतर सांगण्यात आलं की, राग आणि निराशेमुळे सुरेखाने आपल्याच पालकांची हत्या करण्याचा कट रचला होता. नंतर तिने गुप्तपणे त्यांना इंजेक्शनमधून विष दिले. लवकरच तिचे पालक गंभीर आजारी पडले आणि कोसळले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
नंतर वैद्यकीय तपासातून अहवालात तिच्या शरीरात विषारी पदार्थ असल्याने आढळून आल्याने संशय निर्माण झाला. पोलिसांनी तपास सुरु केला असता, कुटुंबातील सदस्य आणि शेजाऱ्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान सुरेखाने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात येत आहे.










