सहा वर्षाच्या चिमुरडीवर 13, 14 आणि 15 वर्षीय मुलाकडून अत्याचार, आरोपीच्या आईने लेकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं
Crime News : सहा वर्षाच्या चिमुरडीवर 13, 14 आणि 15 वर्षीय अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना आहे. पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असल्याची माहिती दिली आहे. मुलीच्या कुटुंबियांनी 18 जानेवारी रोजी या प्रकरणाची तक्रार नोंदवली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सहा वर्षाच्या चिमुरडीवर 13, 14 आणि 15 वर्षाय अल्पवयीन मुलांकडून अत्याचार
आईने पोलिसांच्या हवाली केलं
Crime News : दिल्लीत एका सहा वर्षाच्या चिमुरडीवर 13, 14 आणि 15 वर्षीय अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना आहे. पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असल्याची माहिती दिली आहे. मुलीच्या कुटुंबियांनी 18 जानेवारी रोजी या प्रकरणाची तक्रार नोंदवली होती. तीन आरोपींपैकी एका आरोपीच्या आईने मुलाला पोलिसांच्या हवाली केलं.
हे ही वाचा : 'भाजपकडून अजितदादांना श्रद्धांजलीच्या पानभर जाहिराती, संजय राऊत यांचा भाजपवर संताप
आईने मुलाला पोलिसांच्या हवाली केलं
पोलिसांनी सांगितलं की, महिलेनं घटनेची माहिती मिळवली आणि आपल्या मुलाची चूक लक्षात आल्यानंतर त्याला पोलिसांकडे दिले. त्यानंतर वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली होती. महिलेनं सांगितलं की, तिघेजण मिळून पीडितेला इमारतीच्या छतावर गेले होते. संबंधित प्रकरणात जबाबदार लोकांवर देखील कारवाई करण्यात आली.
आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
या घटनेचा तापस गेल्या चार दिवसांपासून सुरु होता. या प्रकरणी स्थानिकांनी रस्त्यावर प्रदर्शन केलं. वरिष्ठ पोलीस अधिकारी आशीष मिश्रा यांनी सांगितलं की, अल्पवयीन तिघेजण एका फॅक्ट्रीत काम करत होते. दरम्यान, भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत जुवेनाइल जस्टिस बोर्डासमोर उभे केले जाईल. घटनास्थळावरील सीसीटीव्हीचा तपास केला जात आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली असून तिचा जबाब नोंदवला आहे. तिची काळजी घेण्याची अधिक गरज आहे.










