'अजित दादांचा शपथविधी पहिला प्रयोग नव्हता तर तिसरा प्रयोग होता...', रावसाहेब दानवे यांनी सांगितला 'तो' किस्सा
Raosaheb Danve : अजित पवार यांचा सकाळचा शपथविधी हा पहिला प्रयोग नव्हता, तर तो तिसरा विधी होता, असं वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलं. नंतर ते म्हणाले की, आमचा पहिला प्रयोग फसला, नंतर दुसरा प्रयोग देखील फसला. नंतर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथविधी झाला, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'आम्ही दुसरा प्रयोग केला, पण फसला'
नेमकं काय म्हणाले रावसाहेब दानवे?
Raosaheb Danve : 'अजित पवार यांचा सकाळचा शपथविधी हा पहिला प्रयोग नव्हता, तर तो तिसरा शपथविधी होता', असं वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलं. नंतर ते म्हणाले की, 'आमचा पहिला प्रयोग फसला, नंतर दुसरा प्रयोग देखील फसला. नंतर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथविधी झाला', असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं. जालन्यात अजित पवार यांच्या निधनानंतर आज 29 जानेवारी रोजी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत रावसाहेब दानवे यांनी अजित दादांच्या आठवणींना उजाळा दिला.
हे ही वाचा : 'भाजपकडून अजितदादांना श्रद्धांजलीच्या पानभर जाहिराती, संजय राऊत यांचा भाजपवर संताप
नेमकं काय म्हणाले रावसाहेब दानवे?
'अजित दादांचा सकाळचा शपथविधी हा पहिला प्रयोग नव्हता, तर तो तिसरा प्रयोग होता. आम्ही काँग्रेसला बाजूला सारून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मिळून सरकार चालवू', असं दानवे यांनी बोलताना सांगितलं होतं. 'पहिल्या प्रयोगात मंत्री कोण होणार? पालकमंत्री कोण होणार ते नाव ठरलं होतं', असं दानवे म्हणालेत.
'आम्ही दुसरा प्रयोग केला, पण फसला'
तसेच पहिल्या प्रयोगात मोठ्या साहेबांनी सांगितलं की, 'शिवसेना नको भाजप आणि राष्ट्रवादी दोघेच मिळून आपण सरकार चालवू शकतो, पण तो प्रयोग फसला. नंतर आम्ही दुसरा प्रयोग केला, पण तो देखील प्रयोग फसला, तिसरा प्रयोग म्हणजे पहाटेचा शपथविधीचा होता', असं त्यांनी सांगितलं.
हे ही वाचा : अजित पवारांचं विमान क्रॅश होण्यापूर्वी 'क्रू'चे अंतिम शब्द काय होते? DGCA च्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती
दरम्यान, अजित दादांनी राजेश टोपेंना त्यांच्याकडे येण्याची ऑफर दिली होती, पण मला साहेबांची जरा अडचण आहे असं राजेश टोपे त्यांना म्हणाले होते, असंही दानवे यांनी बोलतांना म्हटलंय.










