भाडेकरुंच्या गोड बोलण्याला भुलली! पण घडलं असं की मालकिणीला गमवावा लागला जीव; वाचा नेमकं काय घडलं?
Crime News : भाडेकरुंची पार्श्वभूमी न तपासता त्यांना घर भाड्याने देणे एका वृद्ध महिलेच्या जीवावर बेतले आहे. अमृतसरमधील मजिठा रोडवरील इंदिरा कॉलनी परिसरात एका 65 वर्षीय वृद्ध महिलेची त्यांच्याच घरात राहणाऱ्या भाडेकरूंनी धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाडेकरुच उठले मालकिणीच्या जीवावर
'असा' रचला कट
Crime News : घरात भाडेकरु ठेवण्यापूर्वी त्यांच्या पार्श्वभूमीविषयी खात्री करुन घेणे गरजेचे आहे. अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. भाडेकरुंची पार्श्वभूमी न तपासता घर भाड्याने देणे एका वृद्ध महिलेच्या जीवावर बेतले आहे. अमृतसरमधील मजिठा रोडवरील इंदिरा कॉलनी परिसरात एका 65 वर्षीय वृद्ध महिलेची त्यांच्याच घरात राहणाऱ्या भाडेकरूंनी धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरोड्याच्या उद्देशाने हा खून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
हे ही वाचा : तरुणी प्रेमात आंधळी झाली, प्रेमाला होता विरोध.. इंजेक्शनमध्ये विष घालून आई-वडिलांचा खेळच खल्लास
'असा' रचला कट
वीणा राणी (वय 65) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. त्यांची मुलगी आणि मुलासोबत राहत होत्या. त्यांच्या घरात गेल्या दीड-दोन वर्षांपासून दोन तरुण भाडेकरू म्हणून राहत होते. मृत वीणा राणी या वीज मंडळातून निवृत्त झाल्या होत्या. भाडेकरूंनी ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी पार्टीचे आयोजन केले होते. या बहाण्याने त्यांनी वीणा राणी यांच्या मोठ्या मुलाला वरच्या मजल्यावर बोलावले आणि त्याच्या पेयात गुंगीचे औषध मिसळून त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर पहाटे 1 च्या सुमारास आरोपींनी वीणा राणी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केली आणि घरातील सोन्याचे दागिने व मौल्यवान ऐवज घेऊन ते पसार झाले.
'शांत स्वभावाचे होते भाडेकरु'
मुलीने दिलेल्या माहितीनुसार, दोघेही भाडेकरू अतिशय शांत स्वभावाचे होते आणि अस्खलित पंजाबी बोलत असत. त्यांच्या वागण्यावरून कधीही संशय आला नाही. एकाने आपली पत्नी गावी गेल्याचे सांगितले होते, तर दुसऱ्याने परदेशात जाण्याचे स्वप्न दाखवून कुटुंबाचा विश्वास संपादन केला होता.










