अजितदादांच्या अस्थी पाच मंगल कलशांमध्ये एकत्रित; प्रयागराजसह 'या' ठिकाणी होणार विसर्जन
Ajit Pawar Death : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार पंचतत्वात विलीन झाले. आज तिसऱ्या दिवसाच्या निमित्ताने अजितदादांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर सुरु झाला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी धार्मिक विधींनुसार अजित पवारांच्या अस्थी संकलित केल्या आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अजितदादांच्या अस्थी पाच मंगल कलशांमध्ये एकत्रित
प्रयागराजसह 'या' ठिकाणी होणार विसर्जन
Ajit Pawar Death : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार पंचतत्वात विलीन झाले. आज तिसऱ्या दिवसाच्या निमित्ताने अजितदादांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर सुरु झाला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी धार्मिक विधींनुसार अजित पवारांच्या अस्थी संकलित केल्या आहेत. त्यांच्यासोबत अजित दादांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार, चुलत भाऊ राजेंद्र पवार, रणजित पवार, आमदार रोहित पवार आणि त्यांच्यासोबत संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले आहे.
हे ही वाचा : 'अजित दादांना कालच अग्नी दिलाय, त्यांच्या नावानं राजकारण करणं अमानुष..' संजय राऊतांनी व्यक्त केला संताप
'या' ठिकाणी होणार अस्थींचं विसर्जन
आज सकाळी अजित पवारांच्या अस्थी पाच मंगल कलशांमध्ये एकत्रित करण्यात आल्या आहेत. यापैकी एक कलश अजितदादांच्या मूळ गावी काटेवाडी येथील घरी ठेवला जाईल. दोन कलशांमधील अस्थींचे त्रिवेणी संगम प्रयागराज येथे विसर्जन केले जाईल. काही अस्थींचे विसर्जन बारामतीजवळील कऱ्हा आणि नीरा नदीच्या संगमावर केले जाईल. तर काही अस्थी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांत दर्शनासाठी पाठवल्या जातील.










