मुंबई: परदेशातून आलेल्या महिलेला मुंबईत फसवलं; बनावट पोलिसांनी 66 लाख लुटले, नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

परदेशातून मुंबईत आलेल्या एका 26 वर्षीय तरुणीकडून बनवाट पोलीस अधिकाऱ्यांनी तब्बल 66 लाख रुपयांहून अधिक रक्कम लुबाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील 48 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

परदेशातून आलेल्या महिलेची मुंबईत फसवणूक
परदेशातून आलेल्या महिलेची मुंबईत फसवणूक
social share
google news

बातम्या हायलाइट

point

परदेशातून आलेल्या महिलेची मुंबईत फसवणूक

point

बनावट पोलिसांनी 66 लाख लुटले, नेमकं प्रकरण काय?

Mumbai Crime: परदेशातून मुंबईत आलेल्या एका 26 वर्षीय तरुणीकडून बनवाट पोलीस अधिकाऱ्यांनी तब्बल 66 लाख रुपयांहून अधिक रक्कम लुबाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील 48 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सुरेश रंगनाथ चव्हाण अशी आरोपीची ओळख समोर आली असून त्याला बुधवारी (28 जानेवारी) त्याच्या ठाण्यातील घरातून ताब्यात घेण्यात आलं. या घटनेतील त्याचा एक साथीदार फरार असल्याचं सांगितलं जात आहे. 

66.45 लाख रुपये असलेल्या बॅग्स चोरल्या... 

संबंधित घटना ही 21 जानेवारी रोजी एम. जी. रोडवरील अलाना सेंटर बिल्डिंगजवळ घडली. मूळ केनिया देशाची रहिवासी असलेली 26 वर्षीय सुमय्या मोहम्मद अब्दी मुंबईत टॅक्सीने प्रवास करत होती. त्यावेळी, पोलीस अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या दोन पुरुषांनी तिची गाडी रोखली. तपासणीच्या बहाण्याने त्या आरोपींनी तिच्याकडील 66.45 लाख रुपये रक्कम असलेल्या दोन बॅग्स आपल्या ताब्यात घेतल्या. त्यानंतर, त्या दोघांनी महिलेला पुढील चौकशीसाठी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये येण्यास सांगितलं आणि अचानक बाईकवरून तिच्या पैशांनी भरलेल्या बॅग्स घेऊन ते फरार झाले.  

हे ही वाचा: चंद्रपूर: काँग्रेस नगरसेवकांच्या अपहरणाचा फिल्मी प्रयत्न! वडेट्टीवार-धानोरकर गटवादात हिंसक वळण, समृद्धी महामार्गावर काय घडलं?

पोलिसांचा तपास 

संबंधित तरुणीने आरोपींविरुद्ध माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि तिच्या तक्रारीच्या आधारे, भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी टेक्निकल तपासासाठी एक विशेष पथक तयार केलं आणि 30 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन केल्यानंतर, ठाण्यातील आझाद नगर येथून आरोपी चव्हाणला अटक केल्याचं सांगितलं जात आहे. 

पोलिसांनी आरोपीकडे असलेली 79.35 जप्त केल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून जप्त केलेली रक्कम ही तरुणीने तक्रारीत सांगितलेल्या रकमेपेक्षा जास्त आहे. हे अतिरिक्त पैसे इतर कोणत्या अशाच गुन्ह्यांशी संबंधित आहेत का? याचा देखील तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच, गुन्ह्यात वापरलेली बाईक देखील जप्त करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp