अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' सापडला; आता अपघाताचं नेमकं कारण समोर येणार...
अजित पवार हे त्यांच्या प्रचारसभेसाठी मुंबईतून बारामतीत जात होते आणि लॅन्डिंगच्या वेळी त्यांचं विमान कोसळलं. या भीषण अपघातात विमानातील इतर पाच जणांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. आता, या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून त्यावरून या दुर्घटनेमागील नेमकं कारण स्पष्ट होऊ शकतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' सापडला
आता अपघाताचं नेमकं कारण समोर येणार...
Ajit Pawar Death: बुधवारी (28 जानेवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवार हे त्यांच्या प्रचारसभेसाठी मुंबईतून बारामतीत जात होते आणि लॅन्डिंगच्या वेळी त्यांचं विमान कोसळलं. या भीषण अपघातात विमानातील इतर पाच जणांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. आता, या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून त्यावरून या दुर्घटनेमागील नेमकं कारण स्पष्ट होऊ शकतं.
'ब्लॅक बॉक्स' म्हणजे काय?
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लियरजेट (Learjet) विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. ब्लॅक बॉक्स हे एक उपकरण आहे जे विमानाच्या प्रत्येक हालचालीची नोंद करतं. कोणत्याही विमान अपघातानंतर, अपघाताचे खरं कारण शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्स शोधला जातो. कारण, त्यावरून अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकतं. याचं नाव ब्लॅक बॉक्स असलं तरी तो एक लहान नारंगी रंगाचा लहान डबा असतो.
हा ब्लॅक बॉक्स विमानाचा स्फोट, टक्कर, भीषण आग, उच्च तापमान आणि पाणी यासारख्या कोणत्याही अपघातापासून वाचण्यासाठी डिझाइन केलेला आहे आणि त्यामध्ये फ्लाइटचा डेटा सुरक्षित राहतो. ही माहिती मिळाल्यानंतर, विमान अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी मदत होते. ब्लॅक बॉक्समध्ये सापडलेला डेटा भविष्यात विमानाचे अपघात रोखण्यासाठी प्रभावी ठरतो.
हे ही वाचा: अजित पवारांचं विमान क्रॅश होण्यापूर्वी 'क्रू'चे अंतिम शब्द काय होते? DGCA च्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती
आज म्हणजेच गुरुवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास अजित पवारांवर राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर त्यांचे अंत्यविधी करण्यात आले. यावेळी, क्रेंद्रीय मंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील इतर नेते मंडळी उपस्थित होती.










