दादांचे PSO विदीप जाधव यांच्यावर मूळगावी अंत्यसंस्कार; पोलिसांनी सलामी देताच संपूर्ण गाव हळहळलं VIDEO

मुंबई तक

Ajit Pawar PSO Videep Jadhav Funeral : काल सकाळी बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विदीप जाधव हे देखील प्रवास करत होते. या अपघातात विदीप जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. तरडगाव गावात शोकमय वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ADVERTISEMENT

Ajit Pawar
Ajit Pawar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दादांचे PSO विदीप जाधव यांच्यावर साताऱ्यातील मूळगावी अंत्यसंस्कार

point

पोलिसांनी सलामी देताच संपूर्ण गाव हळहळलं VIDEO

Ajit Pawar PSO Videep Jadhav Funeral ,सातारा : बारामती (पुणे) येथे 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सातारा जिल्ह्यातील तरडगाव (ता. फलटण) येथील विदीप जाधव यांनी देखील जीव गमावलाय. त्यांच्यावर साताऱ्यातील मूळगावी रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले. विदीप जाधव हे मुंबई पोलीस दलात कार्यरत होते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) म्हणून सेवा बजावत होते. या दुर्घटनेने संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

काल सकाळी बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विदीप जाधव हे देखील प्रवास करत होते. या अपघातात विदीप जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. तरडगाव गावात शोकमय वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : 'महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात अजितदादांचं मोठं योगदान', अजितदादांना श्रद्धांजली वाहत मोदींनी केली भाषणाची सुरुवात, नेमकं काय म्हणाले?

विदीप जाधव यांचे पार्थिव रात्री उशिरा त्यांच्या मूळ गावी तरडगाव येथे आणण्यात आले. रात्री साडे अकराच्या सुमारास तरडगाव येथील पालखी स्थळावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिस दलाच्या वतीने बंदुकीच्या सलामी देऊन त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अंत्ययात्रेदरम्यान गावातील वातावरण अतिशय भावनिक झाले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp