जालना : 18 वर्षीय पवनने मुलीला चिठ्ठी दिली, पण जीवानीशी गेला; अंबड तालुक्यात काय घडलं?

मुंबई तक

Jalna Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्रीच्या सुमारास पारनेर फाटा येथे पवन बोराटे आणि संशयित आरोपी राहुल खरे यांच्यात वाद झाला. हा वाद आरोपीच्या बहिणीला पवनने दिलेल्या एका चिठ्ठीवरून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. अत्यंत किरकोळ कारणावरून झालेल्या या वादाचे रूपांतर काही वेळातच हिंसक घटनेत झाले. रागाच्या भरात आरोपी राहुल खरे याने पवन बोराटे यास शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

ADVERTISEMENT

Jalna Crime News
Jalna Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जालना : 18 वर्षीय पवनने मुलीला चिठ्ठी दिली

point

पण जीवानीशी गेला; अंबड तालुक्यात काय घडलं?

Jalna Crime News : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात 18 वर्षीय तरुणाची पोटात चाकू भोसकून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबड तालुक्यातील पारनेर फाटा परिसरात ही घटना घडली असून, या दुर्दैवी प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पवन संतोष बोराटे (वय 18) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी राहुल खरे याला अटक केलीये. 

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्रीच्या सुमारास पारनेर फाटा येथे पवन बोराटे आणि संशयित आरोपी राहुल खरे यांच्यात वाद झाला. हा वाद आरोपीच्या बहिणीला पवनने दिलेल्या एका चिठ्ठीवरून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. अत्यंत किरकोळ कारणावरून झालेल्या या वादाचे रूपांतर काही वेळातच हिंसक घटनेत झाले. रागाच्या भरात आरोपी राहुल खरे याने पवन बोराटे यास शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर हत्या करण्याच्या उद्देशाने आरोपीने पवनच्या पोटात चाकूने दोन गंभीर वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात पवन गंभीर जखमी झाला. रक्तस्त्राव होत असल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच पवनचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर : वसतीगृहात राहणाऱ्या मैत्रिणीचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ गुपचूप शूट केले, अन् बॉयफ्रेंडला पाठवले

घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. या प्रकरणी मयत पवनचे वडील संतोष बोराटे (वय 45) यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी राहुल खरे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ हालचाली करत संशयित आरोपी राहुल खरे यास ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीची कसून चौकशी सुरू असून, घटनेमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp