विद्यार्थ्याने शिक्षिकेला केली बेदम मारहाण, शैक्षणिक संस्थेत भीतीचं वातावरण

मुंबई तक

crime news : विद्यार्थ्याने शिक्षिकेला बेदम मारहाण केली आणि नंतर सार्वजनिक ठिकाणी हल्ला केला. संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला असल्याची माहिती वृत्ताने दिली आहे. एका शैक्षणिक संस्थेत घडलेल्या या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या घटनेनं नेटकऱ्यांना चिंता वाटली आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विद्यार्थ्याने शिक्षिकेला केली मारहाण

point

शिक्षिकेने वादादरम्यान आईविरुद्ध अपशब्द वापरल्याचा आरोप

Crime News : विद्यार्थ्याने शिक्षिकेला सर्वांसमोर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला असल्याची माहिती वृत्ताने दिली आहे. एका शैक्षणिक संस्थेत घडलेल्या या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या घटनेनं नेटकऱ्यांना चिंता वाटली आहे. ही घटना आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात घडली आहे. 

हे ही वाचा : 90 वयाच्या वृद्ध महिलेवर सामूहिक अत्याचार, नराधमांनी ओलांडली क्रूरतेची परिसिमा

विद्यार्थ्याने शिक्षिकेला केली मारहाण

वृत्तमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, सूत्रांनी सांगितलं की, शाळेच्या वेळेत शिक्षकाने विद्यार्थ्याला क्षुल्लक कारणावरून फटकारले असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका साध्या कारणावरून हे प्रकरण सुरु झाल्यानंतर दोघांमध्ये मोठा वाद झाला. या वादानंतर, विद्यार्थ्याने शिक्षकेला बुक्की मारली होती, ज्यामुळे शाळेत गोंधळ निर्माण झाला अशी माहिती आहे. 

शिक्षिकेने वादादरम्यान आईविरुद्ध अपशब्द वापरल्याचा आरोप

सूत्रांनुसार, विद्यार्थ्याने दावा केला की, शिक्षिकेने वादाच्या वेळी त्याच्या आईविरुद्ध अपशब्द वापरले होते, असा आरोप आहे. या दाव्यामुळे पालक आणि स्थानिकांमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर शाळेच्या अधिकाऱ्यांवर घटनेनंतर हस्तक्षेप केला असता, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना कळवण्यात आले होते. 

हे ही वाचा : 'तु मला आवडतेस', म्हणत जालन्यात सासऱ्याने सुनेला मागून मिठीत धरले, नंतर खाली पाडून...

प्रकरण शांत करण्यासाठी कॅम्पसमध्ये आणखी गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून संबंधितांनी मोठा निर्णय घेतला. पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्याला चौकशीसाठी बोलावले. दरम्यान, विद्यार्थी हा अल्पवयीन असून तो परीक्षांची तयारी करत आहे, यामुळे हे प्रकरण काळजीपूर्वक हाताळले जात आहे. शिक्षक विभागाने संबंधित घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. पोलिसांनी सांगितले की, नेमकं काय घडलं या घटनेचा तपास केला जाईल. 

हे वाचलं का?

    follow whatsapp