'तु मला आवडतेस', म्हणत जालन्यात सासऱ्याने सुनेला मागून मिठीत धरले, नंतर खाली पाडून...
Jalna crime : जालन्यात चुलत सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील बदनापूर जिल्ह्यातील नजिक पांगरी येथे घडली होती. पीडितेच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित प्रकरणातील आरोपी हा फरार असून पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'तु मला आवडतेस' म्हणत चुलत सासऱ्याने सुनेला मागून मिठीत धरले
आरोपीने लाकडी दांडा फेकून मारला
Jalna Crime : गौरव साळी - जालन्यात चुलत सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील बदनापूर जिल्ह्यातील नजिक पांगरी येथे घडली होती. पीडितेच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित प्रकरणातील आरोपी हा फरार असून पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
हे ही वाचा : हॉस्टेलमध्ये रक्ताचा सडा, विद्यार्थी झोपेत असतानाच भयानक कांड; नेमकं काय घडलं?
'तु मला आवडतेस' म्हणत चुलत सासऱ्याने सुनेला मागून मिठीत धरले
पीडितेनं दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचे चुलत सासरे हे पीडितेच्या मागे गेले. ती शेतात गेली असता, सावध होऊन तिच्या मागून आपल्या मिठीत घेतले. त्यानंतर 'तु मला आवडतेस', असे म्हणत तिला खाली पाडले आणि तिच्याशी लज्जास्पद कृत्य केले. त्यानंतर तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असे पीडितेनं सांगितले.
हे ही वाचा : बलात्कार पीडितेकडे गावाला मटण अन् दारुची पार्टी देण्याची मागणी, पंचायतीचा अजब निर्णय; पोलिस काय करताहेत?
आरोपीने लाकडी दांडा फेकून मारला
दरम्यान, पीडितेनं प्रतिकार केला असता, तिने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. आरोपीने पडलेला लाकडी दांडा तिच्यावर फेकून मारला होता. या हल्ल्यात तिच्या हाताला दुखापत झाली होती. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला होता. भयभीत झालेल्या पीडितेनं पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली होती. तिच्या फिर्यादीवरून आरोपी चुलत सासऱ्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.










