लग्नाचे खोटे आमिष दाखवून पीडितेशी शरीरसंबंध, नंतर गर्भपात करण्यास भाग पाडले, वर्षभर तरुणीला..
Crime News : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने तरुणीवर वर्षभर लैंगिक अत्याचार केला. नंतर ती गर्भवती राहिल्यावर तिला गर्भपात करण्यास भाग पाडले होते. नंतर तिने लग्नासाठी तगादा लावला असता, तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पीडितेनं पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तरुणाने पीडितेला लग्नाचे खोटे आमिष दाखवून ठेवले शरीरसंबंध
तरुणाच्या नातेवाईकांनी गर्भपात करण्यास पाडले भाग

हे ही वाचा : बुलढाणा : नवऱ्याने महिला शिक्षिकेच्या अपघातासाठी मित्राला दिली सुपारी, अपघाताचं स्वरुप दाखवून केली हत्या
तरुणाने पीडितेला लग्नाचे खोटे आमिष दाखवून ठेवले शरीरसंबंध
घडलेल्या घटनेनुसार, उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये तरुणीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. नंतर सांगितले की, तिची एका वर्षापूर्वी गावातील एका तरुणाशी भेट झाली होती. हळूहळू त्यांच्यात बोलणं सुरु झालं आणि त्याने लग्नाचा प्रस्ताव देखील ठेवला होता. तिने होकाल दिल्यानंतर, लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तो तिच्याशी शरीरसंबंध ठेवू लागला होता.
तरुणाच्या नातेवाईकांनी गर्भपात करण्यास पाडले भाग
दरम्यान, जेव्हा पीडित गर्भवती राहिली तेव्हा त्या तरुणाने आणि त्याच्या नातेवाईकांनी तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. जेव्हा तिने लग्नाचा तगादा लावला असता, त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. दबावाखाली तरुणाने तिच्याशी लग्न करण्यास नकार देत, जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती.
हे ही वाचा : उल्हासनगरमध्ये ऑन ड्युटी सफाई कामगाराची हत्या, शरीरावर केले 32 वार, बायकोनं देखील संपवलं जीवन
या एकूण प्रकरणाने ती मानसिक संकटात सापडली होती. पीडितेनं पोलिसांकडे कारवाईची मागणी केली असता, पोलिसांनी प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई केली.