उल्हासनगरमध्ये ऑन ड्युटी सफाई कामगाराची हत्या, शरीरावर केले 32 वार, बायकोनं देखील संपवलं जीवन

मिथिलेश गुप्ता

Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये महापालिकेच्या कंत्राटी कामगाराची ऑन ड्युटी हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुरुषाच्या हत्येची माहिती तिच्या बायकोला समजताच तिने देखील आत्महत्या करत जीवन संपवलं. या घटनेनं परिसरात तसेच सफाई कामगारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मृत कामगाराचे काम महादू जगताप (वय 35) असे आहे. तसेच हत्या करणाऱ्या तरुणाचे नाव देखील समोर आले आहे. दुर्गेश गुप्ता (वय 31) आणि आत्महत्या केलेल्या बायकोचे नाव पूर्वी महादू जगताप (वय 32) असे आहे. 

ADVERTISEMENT

Ulhasnagar Crime
Ulhasnagar Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उल्हासनगरात शिपाई कामगाराचा मृत्यू

point

महादू जगताप यांच्या शरीरावर 32 ठिकाणी वार

Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये महापालिकेच्या कंत्राटी कामगाराची ऑन ड्युटी हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुरुषाच्या हत्येची माहिती तिच्या बायकोला समजताच तिने देखील आत्महत्या करत जीवन संपवलं. या घटनेनं परिसरात तसेच सफाई कामगारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मृत कामगाराचे काम महादू जगताप (वय 35) असे आहे. तसेच हत्या करणाऱ्या तरुणाचे नाव देखील समोर आले आहे. दुर्गेश गुप्ता (वय 31) आणि आत्महत्या केलेल्या बायकोचे नाव पूर्वी महादू जगताप (वय 32) असे आहे. 

हे ही वाचा : गोड बोलून गर्लफ्रेंडला बोलावून घेतलं, नंतर बॉयफ्रेंडसह चौघांकडून सामूहिक बलात्कार, तरुणीची प्रकृती गंभीर

उल्हासनगरात शिपाई कामगाराचा मृत्यू

घडलेल्या घटनेनुसार, महादू जगताप हे महापालिकेनं कंत्राटीने दिलेल्या एका कोणार्क इन्व्हायको कंपनीत कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करत होता. ही घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील सेक्शन 20 परिसरातील आनंद आईस्क्रीम पार्लरजवळ घडल्याचे वृत्त आहे. 

महादू जगताप यांच्या शरीरावर 32 ठिकाणी वार

महादू हा सकाळी नियमित साफसफाईचे काम करत होता. त्यावेळी एका अज्ञाताने त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात महादू जगताप यांच्या शरीरावर 32 ठिकाणी वार करण्यात आले, ज्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आली आहे. 

हल्लेखोर हा नशेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्लेखोर तरुण हा नशेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. यापूर्वी देखील दुर्गेश गुप्ता आणि महादू जगताप यांच्यात वाद झाला होता. या प्रकरणात दुर्गेशला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.   

हे वाचलं का?

    follow whatsapp