गोड बोलून गर्लफ्रेंडला बोलावून घेतलं, नंतर बॉयफ्रेंडसह चौघांकडून सामूहिक बलात्कार, तरुणीची प्रकृती गंभीर

मुंबई तक

Crime News : ही संतापजनक घटना बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील करनामेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. 5 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणी ही आरोपी उपेंद्र यादव उर्फ लल्लू यादव याची ओळखीची होती. उपेंद्रने तिला भेटण्यासाठी आपल्या 'संइया के डेरा' या गावी बोलावले होते. आपल्या मित्रावर विश्वास ठेवून ही तरुणी त्याला भेटायला गेली होती, मात्र तिथे तिच्यासोबत जे घडले त्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गोड बोलून गर्लफ्रेंडला बोलावून घेतलं,

point

नंतर बॉयफ्रेंडसह चौघांकडून सामुहिक बलात्कार, तरुणीची प्रकृती गंभीर

Crime News : एका तरुणीवर तिच्याच मित्राने अन्य साथीदारांच्या मदतीने सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणीची प्रकृती अत्यंत गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपीसह चार जणांना अटक केली आहे, तर अन्य सहा जणांचा शोध सुरू आहे.

नेमकी घटना कुठे आणि कशी घडली?

ही संतापजनक घटना बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील करनामेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. 5 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणी ही आरोपी उपेंद्र यादव उर्फ लल्लू यादव याची ओळखीची होती. उपेंद्रने तिला भेटण्यासाठी आपल्या 'संइया के डेरा' या गावी बोलावले होते. आपल्या मित्रावर विश्वास ठेवून ही तरुणी त्याला भेटायला गेली होती, मात्र तिथे तिच्यासोबत जे घडले त्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी गावात पोहोचल्यानंतर उपेंद्र आणि त्याच्या इतर नऊ साथीदारांनी तिला निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या अमानवीय कृत्यानंतर तरुणीची प्रकृती खालावली. नराधमांच्या तावडीतून सुटल्यानंतर तिने कसाबसा आपला घरचा रस्ता गाठला आणि घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर तिच्या भावाने तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

हेही वाचा : Chat GPT ला विचारलं आत्महत्या कशी करायची? शेवटी दोन्ही तरुणींचा मृतदेह मंदिराजवळच्या बाथरुममध्ये आढळला

हे वाचलं का?

    follow whatsapp