बीड : अपघातानंतर मुलगा ब्रेन डेड झाला, बापाचा काळजावर दगड ठेऊन मोठा निर्णय, अनेकांना देणार जीवनदान!

मुंबई तक

Beed News : "परवा माझ्या मुलाचा अपघात झाल्याची घटना घडली. त्यामध्ये आम्ही त्याच्या मेंदूचे ऑपरेशन केले मात्र उपयोग झाला नाही .. यानंतर आम्ही सर्वांनी मिळून अवयव दानाचा निर्णय घेतला.. त्याचे शरीर कोणाच्या तरी कामाला यावे. मी माझ्या काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेत आहे... मातीत मिसळणार शरीर मी कुणाच्या तरी कामाला येईल यासाठी हा निर्णय घेतला आहे... "

ADVERTISEMENT

Beed News
Beed News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बीड : अपघातानंतर मुलगा ब्रेन डेड झाला,

point

बापाचा काळजावर दगड ठेऊन मोठा निर्णय, अनेकांना देणार जीवनदान!

Beed News : बीड तालुक्यातील राक्षसभुवन येथील रमेश गाडे यांचा मुलगा संग्राम गाडे अपघात झाल्यानंतर ब्रेन डेड झाला होता. आपल्या मुलाचा देह इतरांच्या कामी येईल, असा विचार करुन बापाने त्याची बॉडी दान करण्याचा निर्णय घेतलाय. डॉक्टरांनी डोळे दान करण्यासाठी विचारणा केली होती, मात्र, रमेश गाडे यांनी व्यापक विचार करत हा निर्णय घेतलाय. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घेऊयात.. 

बीड तालुक्यातील राक्षसभुवन येथील रमेश गाडे यांचा मुलगा संग्राम गाडे याचा काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे अपघात झाला होता... अपघातानंतर संग्राम याला पुणे येथीलच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर तेथील डॉक्टरांनी तो ब्रेन डेड असल्याचे पालकांना सांगितले. दरम्यान, संग्राम याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते... या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी त्याच्या पालकांशी संवाद साधत संग्राम याचे अवयव दान केल्यास काही रुग्णांना जीवदान मिळू शकेल असे सांगितले. यानंतर संग्रामचे वडील  रमेश गाडेंनी व त्यांच्या पत्नी, कुटुंबाने दाखवलेला मनाचा मोठेपणा अनेकांच्या कुटुंबातील सदस्यांना जीवनदान ठरणारा आहे.

हेही वाचा : पॅरोलवर बाहेर आला अन् भररस्त्यात बायकोवर केला गोळीबार, बायकोवर कशाचा राग होता?

"परवा माझ्या मुलाचा अपघात झाल्याची घटना घडली. त्यामध्ये आम्ही त्याच्या मेंदूचे ऑपरेशन केले मात्र उपयोग झाला नाही .. यानंतर आम्ही सर्वांनी मिळून अवयव दानाचा निर्णय घेतला.. त्याचे शरीर कोणाच्या तरी कामाला यावे. मी माझ्या काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेत आहे... मातीत मिसळणार शरीर मी कुणाच्या तरी कामाला येईल यासाठी हा निर्णय घेतला आहे... माझ्या मुलाच्या रूपाने कुणाला तरी दृष्टी मिळेल आणि तो मी उद्या पाहणार आहे.. डॉक्टरांनी विचारल्यानंतर मी त्यांना सांगितले की माझ्या मुलाचे डोळेच नाही तर पूर्ण शरीरच मी देत आहे. त्यामुळे मी माझ्या मुलाचे पूर्ण शरीर दिले आहे आणि मी हे शरीर दान करीत आहे", असं संग्राम गाडेचे वडील म्हणाले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp