विद्यार्थिनीला उचलून घेत मुख्याध्यापकाचा अश्लील गाण्यांवर डान्स, शिक्षक बघत बसले; जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश

मुंबई तक

Crime News : शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सरकारी शाळेत इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमात चक्क डीजेवर अश्लील गाणी लावून विद्यार्थिनींना नाचायला लावल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, नेटकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विद्यार्थिनीला उचलून घेत मुख्याध्यापकाचा अश्लील गाण्यांवर डान्स

point

शिक्षक बघत बसले

point

जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश

Crime News : शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सरकारी शाळेत इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमात चक्क डीजेवर अश्लील गाणी लावून विद्यार्थिनींना नाचायला लावल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, नेटकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील ही घटना आहे.

हे ही वाचा : ब्राह्मण मुलीसोबत तुमच्यातलाच असल्याचं सांगून संबंध ठेवले, गरोदर झाल्याने लग्नाचा तगादा लावताच धर्मांतरासाठी दबाव

अश्लील गाण्यावर डान्स

व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिप्समध्ये 'लूट ए राजा...' सारख्या अत्यंत अश्लील भोजपुरी गाण्यांच्या तालावर विद्यार्थिनी नाचताना दिसत आहेत. संतापजनक बाब म्हणजे, ज्या शिक्षकांवर विद्यार्थ्यांच्या संस्कारांची जबाबदारी असते, तेच मुख्याध्यापक आणि शिक्षक या विद्यार्थिनींसोबत थिरकताना दिसत आहेत. एका क्लिपमध्ये एक शिक्षक हातात छडी घेऊन डान्स रेकॉर्ड करत आहे, तर दुसऱ्या एका क्लिपमध्ये शिक्षक विद्यार्थिनींना उचलून घेत असल्याचे धक्कादायक दृश्य दिसत आहे. १ मार्च रोजी हा सर्व प्रकार शाळेच्या आवारात घडल्याचे सांगण्यात येत आहे.

कठोर कारवाईची मागणी

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक नागरिक आणि पालकांनी शाळेच्या प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. विद्येचे मंदिर समजल्या जाणाऱ्या शाळेत अशा प्रकारचे अश्लील कार्यक्रम कसे आयोजित केले जातात, असा सवाल उपस्थित केला जात आहे. केवळ गाणीच नव्हे, तर शिक्षकांचे वर्तनही अत्यंत आक्षेपार्ह असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे शाळेच्या शिस्तीवर आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp