लोको पायलटला मूळव्याधाचा त्रास, रजेसाठी पँट उतरवून दाखवल्या जखमा, कर्मचाऱ्यांमध्ये संताप
Crime news : लोको पायलटला मूळव्याधाचा त्रास होता आणि त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्याला रजा आवश्यक होती. अधिकाऱ्यांनी त्याला रजा देण्यास नकार दिला होता. त्याने पँट खाली केली आणि त्याच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेचे व्रण दखवले होते. या घटनेचा व्हिडिओ रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये व्हायरल झाला होता, ज्यामुळे कर्मचारी संघटना संतप्त झाल्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लोको पायलटला मूळव्याधाचा त्रास, अधिकाऱ्यांकडून रजा देण्यास नकार
मूळव्याधाची शस्त्रक्रिया केली
Crime news : उत्तर प्रदेशातील लखनऊमधून एक धक्कादायक प्रकार उघ़डकीस आला आहे. एका लोको पायलटला रजा घ्यावी लागली. तो इतक्या अडचणीत होता की रजेशिवाय काम करू शकत नव्हता. वरिष्ठ अधिकऱ्यांनी त्याला रजा देण्यास नकार दिला. नंतर पायलटने आजारी मेडिकल लिव्ह मिळवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याच्या शस्त्रक्रियेच्या जखमा दाखवल्या.
हे ही वाचा : पुरुषाने पैशाचे आमिष दाखवून शेतात नेलं, नंतर 8 वर्षाच्या मुलीवर केले लैंगिक अत्याचार
लोको पायलटला मूळव्याधाचा त्रास, अधिकाऱ्यांकडून रजा देण्यास नकार
लोको पायलटला मूळव्याधाचा त्रास होता आणि त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्याला रजा आवश्यक होती. अधिकाऱ्यांनी त्याला रजा देण्यास नकार दिला होता. त्याने पँट खाली केली आणि त्याच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेचे व्रण दखवले होते. या घटनेचा व्हिडिओ रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये व्हायरल झाला होता, ज्यामुळे कर्मचारी संघटना संतप्त झाल्या.
मूळव्याधाची शस्त्रक्रिया केली
संबंधित प्रकरणात ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशनच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, लोको पायलटवर 22 फेब्रुवारी रोजी मूळव्याध शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 22 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत रजेवर होता. त्याच्या जखमा पूर्ण बऱ्या झाल्या नव्हत्या. योग्य प्रक्रियेनंतर, त्याने आरोग्य विभागाकडून रजा वाढवण्याची विनंती केली. तपासणीनंतर, डॉक्टरांनी रजा आवश्यक असल्याचे मान्य केले.
हे ही वाचा : शिक्षकाच्या शेतात बेकायदेशीर अफूची शेती, गव्हाच्या पिकाआड 27 हजार रोपे
युनियनचे म्हणणे आहे की, लोको पायलटने अधिकाऱ्यांना त्याचा वैद्यकीय अहवाल लॅब रिपोर्ट आणि ड्रेसिंग दाखवलेस परंतु तरीही त्याला रजा दिली नाही. त्याचे कपडे काढून त्याच्या जखमा दाखवण्यास भाग पाडण्यात आले होते. यूनियनने या प्रकरणात लक्ष घालत त्याला रजा देण्यास भाग पाडले होते.










