शिक्षकाच्या शेतात बेकायदेशीर अफूची शेती, गव्हाच्या पिकाआड 27 हजार रोपे
Crime News : शिक्षक हा असंख्य विद्यार्थी घडवत असतो, पण आता एका शिक्षकाने आपल्या शेतात अफूची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी मंगळवारी त्यादरम्यान शेतातून अंदाजे 27 किलो अफूची रोपे जप्त केली आहे. संबंधित प्रकरणात माहिती देणाऱ्या व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गव्हाच्या पिकातून शिक्षकाने अफूची केली लागवड
शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
Crime News : शिक्षक हा असंख्य विद्यार्थी घडवत असतो, पण आता एका शिक्षकाने आपल्या शेतात अफूची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी मंगळवारी टिकमगड जिल्ह्यातील दिगौरा पोलीस ठाणे परिसरात छापा टाकला, त्यादरम्यान शेतातून अंदाजे 27 किलो अफूची रोपे जप्त केली आहे. संबंधित प्रकरणात माहिती देणाऱ्या व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती.
हे ही वाचा : मोबाईल फोनवरून रात्री पती-पत्नीमध्ये वाद अन् सकाळच्या सुमारास घराबाहेर पत्नीचा मृतदेह... नेमकं काय घडलं?
गव्हाच्या पिकातून शिक्षकाने अफूची केली लागवड
रंगतुवान भाटा गावातील खडाई हार परिसरातील पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला होता. गव्हाच्या पिकातून अफूची रोपे अशा प्रकारे लावण्यात आली की, दूरवरून पाहिल्यास ती सामान्य शेती असल्याचं दिसून येत होतं. बामहोरी खास येथील रहिवासी असलेल्या शेतमालकाला घटनास्थळी अटक करण्यात आली होती.
शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
आरोपीला चौकशीसाठी दिगौरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध नार्कोटित ड्रग्ज अँड एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या बेकायदेशीर शेतीत आणखी कोणी सहभागी आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत. काही स्थानिक सूत्रांचा असा दावा आहे की, संबंधित कुटुंब भूतकाळात बेकायदेशीर कामांमध्ये सहभागी होते, दरम्यान पोलिसांनी याची पुष्टी केलेली नाही.
हे ही वाचा : आधी पत्नीची निर्घृण हत्या अन् नंतर ट्रेनसमोर उडी घेऊन पतीची आत्महत्या! अनैतिक संबंधाच्या संशयातून भयंकर घटना...
या प्रकरणात कारवाई करून लवकरच खुलासा केला जाणार असल्याचे सांगितले. लवकरच प्रकरणाचा औपचारिक खुलासा केला जाणार आहे. संबंधित प्रकरणात सांगितले जातेय की, जिल्ह्यात अशा अंमली पदार्थाविरोधात सतत मोहिम राबविली जाते. या प्रकरणाचा आजूबाजूच्या परिसरातही सखोल तपास केला जात आहे.










