मोबाईल फोनवरून रात्री पती-पत्नीमध्ये वाद अन् सकाळच्या सुमारास घराबाहेर पत्नीचा मृतदेह... नेमकं काय घडलं?

मुंबई तक

पती-पत्नीमधील मोबाईलच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास घराबाहेर पीडित महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

ADVERTISEMENT

पत्नीचा घराबाहेर मृतदेह...
पत्नीचा घराबाहेर मृतदेह...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मोबाईल फोनवरून रात्री पती-पत्नीमध्ये वाद अन्...

point

सकाळच्या सुमारास पत्नीचा घराबाहेर मृतदेह

Crime News: पती-पत्नीमधील मोबाईलच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास घराबाहेर पीडित महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याचा संशय व्यक्त केला जात असून आता पोलीस पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सच्या प्रतिक्षेत आहेत. खरं तर, रात्री पती आणि पत्नीमध्ये मोबाईलवरून वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित घटना भोपाळच्या कलजीखेडा परिसरात घडल्याची माहिती आहे. 

पतीने मोबाईल फोन देण्यास नकार दिला अन्...   

पोलिसांच्या माहितीनुसार, सोनम प्रजापती असं मृत महिलेचं नाव समोर आलं असून ती तिच्या पतीसोबत देव ग्रीन सिटीमध्ये राहत होती. दोघांना तीन मुलं असल्याची माहिती आहे. पीडित सोनमने घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. पतीने दिलेल्या जबाबानुसार, रविवारी त्याच्या मोबाईलच्या कारणावरून किरकोळ वाद झाला. पती म्हणाला की, त्याची पत्नी सतत त्याचा मोबाईल मागत होती आणि त्याने मोबाईल देण्यास नकार देऊन तो झोपण्यासाठी गेला. 

हे ही वाचा: महाराष्ट्रातून विनोद तावडेंसह चौघांच्या नावाची घोषणा, राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर

तपासात काय समोर आलं? 

प्राथमिक तपासात समोर आलं की, पती आणि पत्नीमध्ये पूर्वी सुद्धा मोबाईलवरून वाद झाला होता. जवळपास, एक महिन्यापूर्वी अशाच वादातून पत्नीने मोबाईल जमिनीवर आपटून तो तोडून टाकला होता. पण रविवारी, त्यांच्यात मोबाईलवरून पुन्हा वाद झाला. त्यानंतर पती आणि मुले झोपायला गेले. मात्र, सोमवारी सकाळच्या सुमारास घराबाहेर त्याच्या पत्नीचा मृतदेह आढळला. 

हे ही वाचा: आधी पत्नीची निर्घृण हत्या अन् नंतर ट्रेनसमोर उडी घेऊन पतीची आत्महत्या! अनैतिक संबंधाच्या संशयातून भयंकर घटना...

पती-पत्नी मूळ जबलपूरचे रहिवासी असून ते मागील बऱ्याच वर्षांपासून भोपाळमध्ये राहत होते. सध्या, पीडितेच्या कुटुंबियांसह शेजारी राहणाऱ्या लोकांचे सुद्धा जबाब नोंदवले जात आहेत. आता पोलीस पोस्टमॉर्टमची प्रतिक्षा करत असून त्यातूनच महिलेच्या मृत्यूमागचं नेमकं कारण समोर येईल.  

हे वाचलं का?

    follow whatsapp