पुरुषाने पैशाचे आमिष दाखवून शेतात नेलं, नंतर 8 वर्षाच्या मुलीवर केले लैंगिक अत्याचार

मुंबई तक

crime news : पुरुषाने पैशाचे आमिष दाखवून 8 वर्षाच्या मुलीला शेतात नेले, नंतर तिला शेतात नेत लैंगिक अत्याचार केला. संबंधित घटनेनं घटनास्थळ आणि आसपासचा परिसर हादरून गेला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुलीला पैशांचे आमिष दाखवून पीडितेवर लैंगिक अत्याचार 

point

आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

Crime News : एका पुरुषाने पैशाचे आमिष दाखवून 8 वर्षाच्या मुलीला शेतात नेले, नंतर तिला शेतात नेत लैंगिक अत्याचार केला. संबंधित घटनेनं घटनास्थळ आणि आसपासचा परिसर हादरून गेला आहे. ही घटना मध्य प्रदेशातील उमारिया जिल्ह्यातील मानपूर पोलीस ठाणे परिसरात घडली आहे. संबंधित प्रकरणात आरोपीचे नाव हे रवी सिंग असे आहे. 

हे ही वाचा : शिक्षकाच्या शेतात बेकायदेशीर अफूची शेती, गव्हाच्या पिकाआड 27 हजार रोपे

मुलीला पैशांचे आमिष दाखवून पीडितेवर लैंगिक अत्याचार 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी सिंगने मुलीला पैशांचे आमिष दाखवून गावाबाहेरील एका शेतात नेले. त्या ठिकाणी तिने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. घटनेनंतर पीडितेनं घरी धाव घेतली होती. पीडित मुलगी घरी पोहचल्यानंतर, तिने घडलेला सर्व प्रकार तिच्या कुटुंबाला सांगितला होता. कुटुंबाने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती.  

आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

संबंधित प्रकरणात पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली होती. पोलिसांनी कारवाई करत आरोपी रवी सिंग याला अटक केली. प्राथमिक तपासातून त्याला ठाण्यात आणण्यात आले, जिथे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. 

हे ही वाचा : एकीकडे होलिका दहन अन् दुसरीकडे बापाच्या डोक्यात कुऱ्हाडीने सपासप वार; हत्या करुन मुलगा बिर्याणी खाऊन का झोपला?

वैद्यकीय आणि कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. या घटनेनं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. गेली अनेक दिवस महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. या घटनेनं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp